थेरला येथील रहिवासी किसनदेव राख यांच्या फिर्यादीवरून त्यांना ‘तू आमच्या शेतातून ये-जा का करतो’ अशी भांडणाची कुरापत काढून काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात दिनकर राख, सरस्वती राख, सुभाष राख, अनसूया राख (सर्व रा. थेरला, ता. पाटोदा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, दुसऱ्या घटनेत सरस्वती राख फिर्यादीवरून त्यांच्या मुलाला व पतीला ‘तुम्ही आमच्या घरासमोरून ये-जा का करता’ अशी भांडणाची कुरापत काढून मारहाण करण्यात आली, तसेच भांडण सुरू असताना चावादेखील घेतला. त्यामुळे ते जखमी झाले. याप्रकरणी किसनदेव राख, जिजाबा राख, राधाबाई राख, नीलाबाई राख यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोना गरनाळे व क्षीरसागर हे करत आहेत.