शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये ‘समविचारी’साठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:51 IST

समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यासाठी तयारीही चालू आहे. काही नाराजी असली तरी मित्र पक्ष एकत्र येऊन एनडीए आणखी मजबूत करतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : लोकसभा, विधानसभेसाठीची तयारी; संघटनात्मक बैठकीत आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : समविचारी पक्षांना सोबत घेऊन आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, त्यासाठी तयारीही चालू आहे. काही नाराजी असली तरी मित्र पक्ष एकत्र येऊन एनडीए आणखी मजबूत करतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी बीड येथे पत्रकार परिषदेत सांगितले.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी खा. दानवे हे बीड येथे आले होते. यानिमित्ताने त्यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा.डॉ. प्रीतम मुंडे, आ.सुरेश धस, आ.संगिता ठोंबरे, आ.आर.टी. देशमुख, आ.भीमराव धोंडे, गोविंद केंद्रे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बूथ कमिट्या गठित करण्याचा पक्षीय कार्यक्रम होता. यासाठी संपूर्ण महाराष्टÑात फिरून आढावा घेत आहे. पक्षाचे संघटन जोमाने कामाला लागले असून भाजपासाठी वातावरणही पोषक आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात भाजपा सरकारने दिलेली आश्वासने पाळताना शेतकरी, जनतेच्या हिताच्या योजना राबविल्या आहेत आणि उर्वरित काळात प्रलंबित कामे, योजनाही पूर्ण होतील, असे ते म्हणाले.आमच्या काही मित्रपक्षाची नाराजी उघड दिसत असली तरी तीही दूर होईल आणि समविचारी पक्ष आणि आम्ही सर्वजण पुन्हा एकत्र येऊन निवडणूक लढवू. एनडीएतून नितीशकुमार बाहेर पडले होते, परंतु, नंतर ते आमच्यासोबत आले, युतीसाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. समविचारी मतांचे विभाजन कसे टाळता येईल, यासाठी आमचा प्रयत्न असेल, असेही दानवे यांनी यावेळी सांगितले.एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, नजीकच्या काळात राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार शक्य आहे. बीड जिल्ह्याला संधी मिळणार का? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे मात्र त्यांनी टाळले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथे झालेल्या उद्घाटन कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री पंकजा मुंंडे यांना निमंत्रित केले नव्हते, असे विचारले असता ते म्हणाले की, हा पालिकेच्या विकास कामांच्या संदर्भातील कार्यक्रम होता. पंकजा मुंडे ह्या एवढ्या पक्षीय कार्यक्रमात व्यस्त आहेत की, माझ्या मतदारसंघात मी त्यांना तीन महिन्यापासून बोलावतो, आहे परंतु त्यांना वेळ मिळत नाही, असे सांगून निर्माण होऊ घातलेल्या वादावर दानवे यांनी पडदा टाकला.प्रीतम मुंडे उमेदवार : निवडूणही येणार..संघटनात्मक बैठकींचा आढावा घेत जवळपास संपूर्ण महाराष्टÑ फिरलो आहे. भाजपाची स्थिती अतिशय मजबूत आहे. बीड लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार डॉ.प्रीतम मुंडे ह्याच उमेदवार आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट काम केले आहे. प्रीतम मुंडे ह्या आमच्या विजयी उमेदवार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले.

टॅग्स :BeedबीडBJPभाजपाRaosaheb Danweरावसाहेब दानवेPritam Mundeप्रीतम मुंडे