शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

तिहेरी खून: फिर्यादी, आरोपी पक्षांचे जबाब नोंदवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:12 IST

शहराजवळील वासनवाडी शिवारात २७ जुलै रोजी प्रकाश, दिलीप व किरण पवने या तीन सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. मंगळवारी दोन्ही कुटुंबियांचे वेगळे जवाब पोलिसांनी नोंदवून घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराजवळील वासनवाडी शिवारात २७ जुलै रोजी प्रकाश, दिलीप व किरण पवने या तीन सख्ख्या भावांची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात किसन पवने, डॉ.सचिन पवने व अ‍ॅड. कल्पेश पवने यांना अटक झाली आहे. त्यांना न्यायालयाने ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मंगळवारी दोन्ही कुटुंबियांचे वेगळे जवाब पोलिसांनी नोंदवून घेतले.२७ जुलै रोजी वासनवाडी शिवारात १२ एकर शेतीच्या वादातून तीन सख्ख्या भावांची त्यांच्याच मोठ्या भावाने व पुतण्याने निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात पोलिसांकडून विविध दिशेने तपास केला जात असून, संबंधितांची कसून चौकशी केली जात आहे.शेतीचा वाद मागील २० वर्षापासून सुरु होता. तसेच हा वाद न्यायप्रविष्ट होता. त्यामुळे खून होण्यापुर्वी दोन्ही कुटुंबात कशा प्रकारचे वातावरण होते, एवढ्या टोकाचे वाद होतील, अशी परिस्थिती होती का, याविषयी माहिती व जवाब नोंदवण्यासाठी मंगळवारी दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांचे जवाब पोलिसांनी नोंदविले. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.दरम्यान, पोलीस कोठडीमध्ये असलेले किसन, कल्पेश, सचिन यांची कसून तपासणी केली जात आहे. तसेच खून झाला त्यावेळी परिसरातील शेतात काम करणारे कोणी होते का? याचा देखील शोध घेतला जात आहे. यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर करुन मोबाईल लोकेशन व संबंधित यंत्रणेचा आधार तपासासाठी घेतला जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, खूनासाठी वापरण्यात आलेली हत्यारे विहिरीत टाकली होती, त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता, ती हत्यारे पोलिसांना सापडले असून, सबळ पुरावे मिळवण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.पवने कुटुंबियांना मदतीची गरजखून झालेल्या प्रकाश पवने, दिलीप पवने व किरण पवणे यांची परिस्थिती बेताची होती. त्यांच्या कुटुंबाचा आधार ते होते. त्यांचीच हत्या झाल्यामुळे तिन्ही कुटुंबाचा आधार संपला आहे. सर्वबाजूने कुटुंब अडचणीत आहे, त्यांना मदतीची आवश्यकता असून, विविध सामाजिक संघटनांनी व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले जात आहे.‘मास्टरमार्इंड असण्याची शक्यता’डोळ््यात मिर्ची पावडर टाकून व धारदार शस्त्राने वार करुन निर्घृणपणे तिघांची हत्या केली होती. यामध्ये आणखी आरोपी असल्याचा संशय पोलिसांना असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत, तसेच एवढ्या टोकाचे पाऊल मारेकऱ्यांनी का उचलले,त्यामागे कोणी मास्टरमाइंड आहे का त्याचा शोध देखील घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस