यावेळी सेवानिवृत्त नायब तहसीलदार बोथीकर, पोत्रा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. मदन गारोळे, प्रा.अशोक बागुल, सरपंच रघुनाथ गुहाडे, मुख्याध्यापक गणगे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आफ्रोट संघटनेचे तालुकाध्यक्ष साहेबराव खुडे यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास मोहनराव भिसे, आयोजक बबन गुहाडे, रघुनाथ गुहाडे, भाऊराव गुहाडे, दत्तात्रय शेळके, शिवाजी मोहोरे, गणेश झाटे, सचिन डुडुळे, बबन पोटे, दत्ता गुहाडे, अनिल सोनटक्के, विशाल फुपाटे, नामदेव पाचपुते, मधुकर भुरके, संतोष आमले, बोडखे, केशव कुरुडे व नागरिक उपस्थित होते. साहेबराव माहोरे यांनी सूत्रसंचालन केले. आभार घनशाम कोवे यांनी मानले.
100821\purusttam karva_img-20210810-wa0032_14.jpg
माजलगाव येथे जागितक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.