शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

शेतकरी कुटुंबातील वृक्षसुंदरी; निमित्त स्पर्धेचे, ज्ञान निसर्गाचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 4:52 PM

बीडजवळ राखीव जंगलक्षेत्र कोणते? आसपासच्या पाच झाडांची नावे सांगा, झाडांचे फायदे, झाडे का लावावीत, जगात दोन ठिंकाणी वणवा कुठे पेटला?

ठळक मुद्दे भारतात सर्वात मोठे वडाचे जाड कोठे आहे? बीडजवळ राखीव जंगलक्षेत्र कोणते?

बीड : पालवन येथे सह्याद्री देवराईत झालेल्या पहिल्या वृक्ष संमेलनात शेतकरी कुटुंबातील क्रांती रामहरी बांगर हिने वृक्ष सुंदरीचा मुकूट पटकावला. गुरूवार आणि शुक्रवारी झालेल्या स्पर्धेनंतर समारोपाला सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी हा निकाल जाहीर केला. बी.एस्सी कृषी पदविका प्राप्त क्रांती बांगर ही बीडच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी. 

आयटीआयमधील सुवर्णा बागडे, नानासाहेब शिंदे व अन्य शिक्षकांनी प्रोत्साहन दिल्याने वृक्ष सुंदरी स्पर्धेत भाग घेतला. बीएस्सी. अ‍ॅग्री झाल्याने झाडांबद्दल माहिती होती. त्यामुळे भाग घेताना आत्मविश्वास होता. वडिल शासकीय सेवेत चालक आहेत. आई- वडिलांनी शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिल्याने फायदा झाल्याचे सांगून क्रांती म्हणाली, ‘या निवडीमुळे जबाबदारी वाढल्याचे ती म्हणाली. धारूर तालुक्यातील घागरवाडा हे माझं गाव. गावाला देवराई करण्याचा प्रयत्न राहील. रासेयोच्या माध्यमातून एक हजार वृक्ष लागवड आणि संगोपनाचे मी व सहकाऱ्यांचे ध्येय आहे.’

निमित्त वृक्ष सुंदरीचे, ज्ञान निसर्गाचे सह्याद्री देवराईत पार पडलेल्या पहिल्या वृक्ष संमेलनात वृक्ष सुंदरी ही आगळीवेगळी स्पर्धा घेण्यात आली. निमित्त वृक्ष सुंदरीचे असलेतरी वृक्ष चळवळीत तरूणींचा सहभाग वाढावा हाच यामागील उद्देश होता. स्पर्धेच्या रॅपिड फायर राऊन्डसाठी निवडलेल्या दहा तरूणींमध्ये निसर्गातील सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांवर स्पर्धा झाली.  बीडजवळ राखीव जंगलक्षेत्र कोणते? आसपासच्या पाच झाडांची नावे सांगा, झाडांचे फायदे, झाडे का लावावीत, जगात दोन ठिंकाणी वणवा कुठे पेटला? झाडांवर उडणारा प्राणी कोणता? झाडे वाचविण्यासाठी झालेली आंदोलने, चिमण्यांना कोणती झाडे आवडतात? का? झाडाबंद्दल उस्फूर्त दहा वाक्यात माहिती. पारंब्या का होतात? कुठल्या झाडाबद्दल अंधश्रद्धा आहे? कोणत्या कालावधीत झाडांना जपले पाहिजे? काटेशेवरी झाड कसे आहे? भारतात सर्वात मोठे वडाचे जाड कोठे आहे? मी वृक्ष सुंदरी झाले तर? झाडांच्या ओव्या सांगा. सह्याद्री देवराई परिसरात झाडे कोणत्या पध्दतीने लावण्यात आली? अजाणवृक्ष कोणते? गौतम बुध्द यांना ज्ञानप्राप्ती कोणत्या झाडाखाली झाली? अशा प्रश्नांच्या माध्यमातून स्पर्धक तरूणींचे ज्ञान परीक्षकांनी जाणून घेतले. जिथे स्पर्धक निरुत्तर होत तेथे पॅनलमधील तज्ज्ञ उत्तरे देऊन माहिती सांगत होते.  

टॅग्स :environmentपर्यावरणBeedबीडsayaji shindeसयाजी शिंदे