शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टाफ’ असल्याचे सांगून फुकटात प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 01:02 IST

मी राज्य परिवहन महामंडळाचाच कर्मचारी आहे, असे सांगत फुकटात प्रवास करणाऱ्या एकाला चांगलेच अंगलट आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मी राज्य परिवहन महामंडळाचाच कर्मचारी आहे, असे सांगत फुकटात प्रवास करणाऱ्या एकाला चांगलेच अंगलट आले आहे. पथकाच्या तपासणीत हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर त्याला पकडून पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. गुरूवारी दुपारी हा प्रकार बीड शहरातील बार्शी नाका परिसरात घडला. अब्दुल फहिम अब्दुल जलील मोमीन (वय ४०, रा. मोमीनपूरा, बीड) असे या प्रवाशाचे नाव आहे.कळमनूरी - बीड ही बस (क्र. एम एच २०, बीएल १७९३) बीडकडे येत होती. बसमध्ये सुमारे ८० च्या जवळपास प्रवासी होते. अब्दुल हा तेलगाव येथून बसमध्ये बसला. त्याने वाहकाला आपण रामपचा ‘स्टाफ’ असल्याचे सांगितले. वाहकाने ओळखपत्र मागितल्यावर त्याने नंतर दाखवितो असे सांगितले. जास्त प्रवासी असल्याने वाहक विसरले. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास पथकाने (क्र.पाच) बार्शी नाका परिसरात अचाकन बसची तपासणी केली.यावेळी अब्दुलकडे तिकिट नसल्याचे दिसले. वाहतूक निरीक्षक टी. डी. कलीके, वाहतूक नियंत्रक बी. टी. सेलूकर यांनी त्याची तपासणी केली. यावेळी त्याने आपण बीडच्या वर्कशॉपमध्ये काम करीत असल्याचे सांगितले. उलटतपासणी करून माहिती घेतली असता हा सर्व प्रकार खोटा असल्याचे समजले. त्यानंतर बस स्थानकात नेली. तेथे प्रवासी सोडल्यानंतर शिवाजीनगर ठाण्यात बस आणली. परंतु हद्द पेठबीड ठाण्याची असल्याने ती पुन्हा तिकडे नेण्यात आली. येथे वाहक लक्ष्मण शंकर हनवते यांच्या तक्रारीवरुन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.एईओ पन्हाळकर, नाव सांगितले तिसरेच..अब्दुलने कार्यशाळेत कार्यरत असल्याचे सांगताच निरीक्षक सेलूकर यांनी तुमचे यंत्र अभियंता (एमईओ) कोण आहेत? अशी विचारणा केली. तीन मिनिटात त्यांनी सहा नावे सांगितले. प्रत्यक्षात मात्र, अशोक पन्हाळकर यांचे नावच घेतले नाही. त्यावरून अब्दुल हा खोटे बोलत असल्याचे उघड झाले. त्याचा फोटोही कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांना पाठविला होता. यामध्ये एकानेही त्यांना ओळखले नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीstate transportएसटीArrestअटक