सात नायब तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:38 AM2021-09-23T04:38:37+5:302021-09-23T04:38:37+5:30

बीड : राज्य सरकारने महसूल प्रशासनात मोठ्या प्रमाणावर बदल केले असून नायब तहसीलदार संवर्गातील अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या ...

Transfers of seven Deputy Tehsildars | सात नायब तहसीलदारांच्या बदल्या

सात नायब तहसीलदारांच्या बदल्या

Next

बीड : राज्य सरकारने महसूल प्रशासनात मोठ्या प्रमाणावर बदल केले असून नायब तहसीलदार संवर्गातील अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात बीड जिल्ह्यातील सात नायब तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. यात सहा जण जिल्ह्याबाहेर गेले आहेत. तर बीड जिल्ह्यात केवळ एकाच नायब तहसीलदाराची इतर जिल्ह्यातून नियुक्ती करण्यात आली आहे.

आता जिल्ह्यात नायब तहसीलदारांच्या अनेक जागा रिक्त राहणार आहेत. अधिकाऱ्यांविना कारभार कसा चालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अगोदरच रिक्त जागांची समस्या भेडसावत असलेल्या बीड जिल्ह्यात आता नायब तहसीलदारांच्या अनेक जागा पुन्हा रिक्त होत आहेत. सहा नायब तहसीलदार जिल्ह्याबाहेर गेले असताना बीड जिल्ह्यात केवळ एकाचीच नियुक्ती करण्यात आली आहे.

बदल्यांमध्ये राजेश्वर पवळे (नरेगा बीड ते परभणी), लक्ष्मीकांत खळीकर (तहसील अंबाजोगाई ते परभणी), प्रदीप पाडुळे (तहसील आष्टी ते उस्मानाबाद), सय्यद इसाकोद्दीन (जिल्हाधिकारी कार्यालय बीड ते औरंगाबाद), बाळदत्त मोरे (उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा ते तहसील आष्टी), संजीव राऊत (तहसील बीड ते औरंगाबाद), संजय जिरांगे (हिंगोली ते तहसील वडवणी), किशोर सानप (तहसील शिरूर ते अहमदनगर) यांचा समावेश आहे.

Web Title: Transfers of seven Deputy Tehsildars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.