शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

भावासोबत खेळताना चिमुकला विहिरीत पडला, १२ तासाने मृतदेह बाहेर काढण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 12:30 IST

आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथील घटना 

- नितीन कांबळे कडा- घरापासून काही अंतरावर खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. विहिरीतील पाणी उपल्यानंतर आज पहाटे चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. माऊली निकाजी काळे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथे राहत असलेल्या एका पारधी वस्तीवर काळे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. लाईट नसल्याने काळे कुटुंब जवळच्या विहिरीवरून शेंदून पाणी आणत. सोमवारी दुपारी काळे यांचे दोन लहान मुले खेळतखेळत विहिरीकडे गेले. दरम्यान, माऊली निकाजी काळे ( ५ ) हा विहीरीत पडला. त्यानंतर लहान भावाने घरी येऊन माऊली विहरीत पडल्याचे सांगितले. 

दरम्यान, चिमुकला विहिरीत पडल्याची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनी धाव घेतली. मात्र, विहीर खोल असून त्यात पाणी होते. त्यात लाईटची सोय नसल्याने ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने जनरेटर लावण्यात आले. संपूर्ण पाणी उपसल्यानंतर आज पहाटे चार वाजेच्या दरम्यान माऊलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे आणण्यात आला आहे.

घटनास्थळी आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार नवनाथ काळे,पोलिस नाईक संतोष दराडे यांनी पंचनामा केला.तर चंद्रकांत गळगटे, राजेश कराड, मच्छिंद्र डोंगरे, बाबूलाल आंधळे, संतोष आंधळे यांच्यासह ग्रामस्थानी मृतदेह काढण्यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी