शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या त्या आश्वासनानंतर कुटुंबियांनी मृतदेह घेतलं ताब्यात; संतोष मुंडेवर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 16:25 IST

टिक टॉक स्टार संतोष मुंडे यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

बीड: ग्रामीण भागातील प्रसिद्ध टिक टॉक स्टार संतोष मुंडे यांचा विजेचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे आज (दि.13 मंगळवारी) सांयकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. विजच्या झटक्याने संतोषसह त्याचा मित्र बाबुराव मुंडे याचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील टिक टॉक स्टार  संतोष मुंडे व त्याचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विज आल्यामुळे दोघांचा करंट लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. संतोषला दोन लहान मुली आणि एक मुलगा आहे. मात्र संतोषच्या अचानक मृत्यूनं पत्नीसह चिमुकली पोरंही पोरकी झाली. 

भोगलवाडी येथील विद्युत डीपीचे अनेक केबल उघडे असून तक्रार करून देखील याची दुरुस्ती होत नाही आणि याच केबालचा शॉक लागून या दोघांचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. महावितरणच्या आगलथाण कारभारामुळेच या दोघांचा जीव गेला असून यामध्ये दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. मात्र महावितरणने योग्य कारवाई करु, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन संतोषवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सदर घटनेची माहिती कळताच समाज माध्यमातून तीव्र दुखः व्यक्त केले जात आहे. अतिशय गरीब घरातून आलेल्या संतोष मुंडेने आपल्या व्यंगावर मात करत टिक टॉकच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली होती. सोशल मीडियावर संतोषचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग होता. त्याच्या अशा अकाली निधनामुळे सर्वत्र व्यक्त होत आहे. 

दरम्यान, संतोषनं अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. गावरान बाज आणि अस्सल गावरान साज यांचा मेळ संतोषच्या टिकटॉक व्हिडीओंमध्ये चाहत्यांना पाहयला मिळायचा. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या संतोषनं आपल्या नावाची दखल घेण्यास सर्वांना भाग पाडलं होतं. संतोष गावरान स्टाईलमधील हटके व्हिडीओंसाठी ओळखला जायचा. टिकटॉकनंतर संतोषनं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ टाकण्यास सुरुवात केली होती. सोशल मीडियावर अल्पावधीतच तो लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकSocial Mediaसोशल मीडिया