शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये थरार! लग्न समारंभात पाहुणे बनून चोरी करणारी आंतरराज्य 'सिसोदिया गँग' गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:52 IST

बीडमध्ये थरार! पोलिसांनी दरोडेखोरांचा मस्साजोगपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग केला; नागरिकांच्या मदतीने टोळी जेरबंद.

बीड : लग्न समारंभात पाहुणे किंवा भिकारी बनून दागिने चोरणे, तसेच अंगावर टोमॅटो सॉस टाकून नागरिकांचे लक्ष विचलित करत पाकीटमारी करणे, अशा आंतरराज्यीय गुन्ह्यांची 'मोडस ऑपरेंडी' (गुन्हा करण्याची पद्धत) असलेल्या टोळीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली आहे. मध्यप्रदेशातील या टोळीने बीड, अंबाजोगाई आणि गेवराई परिसरात धुमाकूळ घातला होता.

बादल कृष्णा सिसोदिया (वय २४), काला उर्फ ऋतिक महेश सिसोदिया (वय २९), दीपक दिलीप सिसोदिया (वय २९) आणि जस्वंत मनिलाल सिसोदिया (वय २७) (सर्व रा. गुलखेडी, ता. पाचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीतील आरोपींची चोरी करण्याची पद्धत अत्यंत वेगळी होती. ते लग्न समारंभात पाहुण्यांच्या किंवा भिकाऱ्यांच्या वेशात जात दागिने चोरत. तसेच, बँकेतून पैसे काढणाऱ्या लोकांवर पाळत ठेवून त्यांच्या पैशांची बॅग हिसकावणे, तसेच अंगावर टोमॅटो सॉस टाकून नजर हटवून हातातील पैसे घेऊन पळून जाणे, अशा पद्धतीने ते नागरिकांची फसवणूक करत. १२ डिसेंबर रोजी हे चौघे चोरीच्या दुचाकी घेऊन केजमध्ये एका बॅग लुटण्याच्या इराद्याने आले होते, परंतु त्यांचा प्लॅन फसला. ते दोन विना क्रमांकाच्या दुचाकीवरून बीडकडे पळत होते. याच दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्यांचा संशय आला आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यातील दोघांना पोलिसांनी जागीच पकडले, तर उर्वरित दोघांना मस्साजोगपर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांना सामान्य लोकांनीही मदत केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी, मोबाइल असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीला अटक केल्याने या परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

या पथकाने केली कामगिरीएलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक महेश विघ्ने, बप्पासाहेब घोडके, राजू पठाण, महेश जोगदंड, युनूस बागवान, भागवत शेलार, गणेश मराडे आदींनी केली. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

लग्नात लहान मुलेही करतात चोरीलग्न समारंभात याच सिसोदिया गँगमध्ये मोठ्यांसोबत लहान मुलेही असतात. नवरीच्या खोलीत अथवा गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्स चोरी करण्याचे काम ही लहान मुले करतात. यापूर्वी बीड, आष्टीमध्ये असेच प्रकार घडले होते. तसेच छत्रपती संभाजीनगर पोलिसांनीही अशा प्रकारची टोळी पकडली होती. आता बीड पोलिसांनीही ही टोळी पकडली आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.

नंदुरबारला चोरी करून बीडमध्ये प्रवेशनंदुरबार जिल्ह्यात याच टोळीने बॅग लिफ्टिंग केली होती. तेच पैसे घेऊन हे चाेरटे बीड जिल्ह्यात आले होते. केजमध्ये एका बँकेत त्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. त्यामुळे ते बीड शहरात येत होते. परंतु त्या आधीच त्यांना मस्साजोगजवळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Interstate ' सिसोदिया Gang' arrested in Beed for wedding theft.

Web Summary : Beed police arrested an interstate gang, 'Sisodia Gang', from Madhya Pradesh, for theft at weddings and pickpocketing using unique methods like throwing tomato sauce. They were caught with stolen bikes and valuables worth ₹2.5 lakhs. Further investigation is underway to unearth more crimes.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याRobberyचोरी