शहरं
Join us  
Trending Stories
1
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
2
अपघातग्रस्ताला 1.5 लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
3
Share Market Down: शेअर बाजारात ५०० अंकांपेक्षा अधिक घसरण, निफ्टीबी २५,८०० च्या खाली; 'ही' आहेत ५ कारणं
4
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
5
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
6
Ritual: सावधान! तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? आधी 'हे' वाचा
7
काळाचा घाला! MBBS विद्यार्थ्यासोबत आक्रित घडलं, नेपाळमध्ये मृत्यूने गाठलं; १० मार्चला होतं लग्न
8
२० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीचे ५५ रुपये लावले; ग्राहकाने रेस्टॉरंट मालकाला शिकवला धडा
9
"CM फडणवीसांनी शेजारच्या खुर्च्यांवर कोण बसलंय ते बघावं"; भीती संगम म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
एक दिवसाच्या दूध-ब्रेडपेक्षाही स्वस्त आहे 'या' देशात सोनं; एका ग्रॅमसाठी मोजावे लागतात अवघे इतके रुपये!
11
"शशांकने एवढा तमाशा करायला नको होता...", मंदार देवस्थळींच्या वादात अभिनेत्रीच्या नवऱ्याची उडी, म्हणाला- "माझ्या बायकोचेही ३.५० लाख..."
12
WPL 2026 Opening Ceremony : हरमनप्रीत अन् स्मृती मैदानात उतरण्याआधी या बॉलिवूडकरांचा दिसणार जलवा
13
'लाडक्या बहिणीं'साठी स्टार प्रचारकही मैदानात, महिला मतांचा कौल ठरणार निर्णायक
14
पगारवाढ हवी असेल तर ऑफिसला यावंच लागेल; TCS चा कडक पवित्रा, 'WFO' अटेंडन्स पूर्ण नसल्यास अप्रेझल रखडणार
15
Social Viral: कोण म्हणतं पाणीपुरी विकणं छोटं काम आहे? तापसीने करून दाखवलं 'वर्ल्ड रेकॉर्ड'
16
'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका
17
२ हजारांच्या नोटा, फॉरेन करन्सी... अपघातात मृत्यू झालेल्या भिकाऱ्याच्या बॅगेत सापडले ४५ लाख
18
Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार
19
जगात 'या' ठिकाणी मिळते सर्वात स्वस्त चांदी; भारतापेक्षा तब्बल 40 हजार रुपयांनी स्वस्त...!
20
बापानं किडनी देऊन वाचवलं, कर्जाचा डोंगर उपसून उपचार केले; पण त्याच मुलानं आयुष्य संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

गांजाच्या झुरक्यासाठी तीन तरुणांनी लुटले प्रवाशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:30 IST

गांजाच्या व्यसनापायी तीन तरूणांनी एका प्रवाशास मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या प्रकरणाचा छडा लावत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या.

ठळक मुद्देबीडमधील प्रकार : अवघ्या सहा तासामध्येच प्रकरणाचा छडा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गांजाच्या व्यसनापायी तीन तरूणांनी एका प्रवाशास मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या प्रकरणाचा छडा लावत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शेख शाहरूख शेख बाबा (२६), शेख आमेर शेख अख्तर (२३) व शेख अब्बास शेख रशीद (२५ सर्व रा.बीड) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. सय्यद सज्जात शामद (२३ रा.नित्रूड ता.माजलगाव) हे पुण्यात चालक म्हणून काम करतात. बुधवारी गावाकडे कार्यक्रमानिमित्त ते आले होते. रात्री ८ वाजता ते बीडमध्ये उतरले.मात्र, गावाकडे जाण्यास उशीर झाल्याने ते बीडमधील बार्शी नाक्यावरील शेख इम्रान या पाहुण्याकडे राहण्यासाठी रिक्षातून (एमएच २३ एआर ०२३९) निघाले. बसस्थानकापासून थोडे पुढे आल्यावर आणखी दोघे रिक्षात बसले.सोमेश्वर मंदिराजवळ जाताच त्यांनी रिक्षा स्मशानभूमीकडे वळविला. येथेच त्यांना मारहाण करून मोबाईल व रोख ९० रूपये काढून घेत त्यांनी पोबारा केला. त्यानंतर सय्यद यांनी शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरविली आणि अवघ्या सहा तासांत तिघांच्याही मुसक्या आवळल्या.ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे, सहायक पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे व त्यांच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एस. ढगारे हे करीत आहेत.आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता४यातील शाहरूख हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.४तसेच सदरील टोळीने अनेकांना रात्रीच्यावेळी लुटल्याची शक्यता आहे.४तपासात त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची कबुली मिळू शकते, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी