शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

स्वातंत्र्य सैनिकाच्या बोगस प्रमाणपत्रावर नौकरी बळकावणारे बीडच्या आरोग्य विभागातील तीन कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:30 IST

यापूर्वी बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी वर्ग ४ च्या १७ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली होती.

ठळक मुद्दे १०६ जणांनी जिल्ह्यात नोकऱ्याही मिळवल्याप्रकरण  सन २००३ मध्ये  समोर आले होते.

बीड : स्वातंत्र्य सैनिक असल्याचे भासवून खोटे प्रमाणपत्र काढत नौकरी बळकावणाऱ्या आरोग्य विभागातील वर्ग ३ च्या तीन कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. लातूरचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी हे आदेश नुकतेच काढल्याचे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी वर्ग ४ च्या १७ कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई केली होती.

सतीश नारायण भांडवलकर (रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी), राजरत्न श्रीमंतराव जायभाये (औषधनिर्माता) व अनिल शिवाजी नवले (भांडार तथा वस्त्रपाल) अशी बडतर्फ झालेल्या वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व कर्मचारी जिल्हा रूग्णालयात कार्यरत होते. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नसताना खोटी कागदपत्रांच्या आधारे  स्वातंत्र्यसैनिक असल्याचे गौरव पत्र मिळवून त्या आधारे जिल्ह्यातील शेकडो जणांनी निवृत्ती वेतनाचा लाभ मिळवल्याचे प्रकरण  सन २००३ मध्ये  समोर आले होते. शिवाय, स्वातंत्र्यसैनिक पाल्यांना देण्यात येणाऱ्या सवलतींचा लाभ घेत १०६ जणांनी जिल्ह्यात नोकऱ्याही मिळवल्या होत्या, मात्र,  हे प्रकरण समोर आल्यानंतर न्यायालय व शासनाच्या आदेशानंतर आता या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यास सुरुवात झाली आहे. २८ फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा रुग्णालयातील वर्ग चारच्या आस्थापनेवरील १७ कर्मचाऱ्यांना डॉ. अशोक थोरात यांनी बडतर्फ केले होते. तर वर्ग ३ च्या पाच कर्मचाऱ्यांवर आरोग्य उपसंचालक कारवाई करणार होते.

दरम्यान, राहिलेल्या पाच पैकी दोन कर्मचारी हे उस्मानाबाद व लातूर येथे कार्यरत असून तीन कर्मचाऱ्यांवर उपसंचालकांनी बडतर्फची कारवाई केली आहे.  या कारवाईने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. इतर विभागातील कर्मचाऱ्यांवर मात्र अद्यापही कारवाई झाली नसल्याचे दिसून  येत आहे.

यापूर्वी या कर्मचाऱ्यांवर झाली होती कारवाई भानुदास एकनाथ उगले (कक्षसेवक), बबन रघुनाथ वनवे (सफाईगार), सुखदेव बाबासाहेब वनवे (सफाईगार), महारुद्र लाला किर्दांत (पहारेकरी), भागवत लोभा वडमारे (कक्षसेवक), द्वारका सुभाष नागरगोजे (प्रयोगशाळा स्वच्छक), परमेश्वर भानुदास जगताप (कक्षसेवक), तुकाराम सूर्यभान जगताप (कक्षसेवक), संगीता विठ्ठल मुळे (बाह्यरुग्ण सेवक), महारुद्र बाबासाहेब वनवे (प्रयोगशाळा परिचर), तात्यासाहेब लक्ष्मण सांबरे (कक्षसेवक), अशोक नानाभाऊ आडसूळ (कक्षसेवक), प्रकाश रघुनाथ बडगे (शिपाई), सुंदरराव दत्तात्रय बडगे (कक्षसेवक), युवराज रघुनाथ शिंदे (कक्षसेवक), प्रल्हाद भीमराव गर्कळ (कक्षसेवक), हनुमंत ज्ञानोबा तुपे (कक्षसेवक) या सर्व १७ कर्मचाऱ्यांवर (वर्ग ४) बडतर्फची कारवाई झाली होती. आता वर्ग ३ च्या सतीश नारायण भांडवलकर (रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी), राजरत्न श्रीमंतराव जायभाये (औषधनिर्माता) व अनिल शिवाजी नवले (भांडार तथा वस्त्रपाल) या कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडsuspensionनिलंबनState Governmentराज्य सरकार