शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मेटेंच्या स्वीय सहायकांकडून मुख्याधिकाऱ्यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 00:10 IST

बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना आ.विनायक मेटे यांचे स्वीय सहायक विनोद कवडे यांनी ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली.

ठळक मुद्देरस्ते कामांचा विषय : बोलता-बोलता काही त्रुटींवरून वाद

बीड : बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना आ.विनायक मेटे यांचे स्वीय सहायक विनोद कवडे यांनी ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी दुपारी बीड नगर पालिकेत घडला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस दप्तरी नोंद नव्हती.मुख्याधिकारी दोरकुळकर हे मंगळवारी दुपारी कार्यालयीन कामकाज करीत होते. याचवेळी कवडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे आले. त्यांनी कागदपत्रांची माहिती मुख्याधिकाऱ्यांना विचारली. त्यांनीही दिली.मात्र, बोलता बोलता काही त्रुटींवरून दोघांत शाब्दिक चकमक झाली. याचवेळी कवडे यांनी मुख्याधिका-यांना ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर मुख्याधिका-यांनाही राग अनावर झाला आणि ‘काय बघून घेतो’ असे म्हणत त्यांनीही प्रत्युत्तर दिले. मुख्याधिकाºयांच्या कक्षात गोंधळ झाल्याचे पाहून आरडाओरडा ऐकून पालिकेतील इतर कर्मचा-यांनी धाव घेतली.त्यांनी दोघांचा वाद मिटविला. यामुळे पालिकेचे कामकाजही काही वेळ ठप्प झाले होते. कर्मचा-यांनी या घटनेचा निषेधही नोंदविला आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल नव्हती.वादाचा व्हिडीओ व्हायरलमुख्याधिकारी व स्वीय सहायकांच्या वादाचा व्हिडीओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पालिका कर्मचा-यांनी झालेल्या प्रकाराचा निषेध नोंदवित संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. बुधवारी संघटना याबाबत जिल्हाधिकाºयांनाही भेटणार आहे.

बीडमधील रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी आणला. दोन महिन्यांपासून योग्य ती कार्यवाही करून याचे टेंडर काढा म्हणून विनंती केली. रस्ते झाले तर नागरिकांनाच फायदा होणार आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नव्हती. याच कामासंदर्भात माझे स्वीय सहायकही भेटायला गेले होते. वाद झाला किंवा नाही, हे माहिती घेऊन सांगेन. -आ.विनायक मेटे, बीड

टॅग्स :BeedबीडVinayak Meteविनायक मेटेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस