शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कोळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच घरे फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:14 IST

तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला चार ते पाच घरे फोडून चोरटे पसार झाले.या घटनेमुळे कोळगावांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देनागरिकांत दहशत : फिल्मी स्टाईल पाठलाग; चार तासांत पोलिसांनी केले चोरट्यांना जेरबंद; गस्तीची मागणी

गेवराई : तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला चार ते पाच घरे फोडून चोरटे पसार झाले.या घटनेमुळे कोळगावांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामध्ये उद्धव करांडे यांच्या घरामध्ये चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून सोने दागिन्यांसह ६० ते ७० हजारांचा ऐवज लुटून नेला. या घटनेने कोळगावसह परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी गावातील पाच घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अविनाश गवळी, सिंधूबाई काशिद यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी घरात राहणाऱ्या नागरिकांना जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसल्याने त्यांनी याठिकाणाहून पळ काढला. त्यानंतर जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मदनराव घाडगे यांच्या घराचे पाठीमागून गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर कपाट फोडून दागदागिन्याची पेटी फोडताना आवाज झाल्यामुळे त्यांच्या पत्नी जाग्या झाल्या, कोण आहे? कोण म्हणत मोठा आवाज होत असल्याने चाकूचा धाक दाखवून धूम ठोकली. त्यानंतर मोबाईलच्या संपर्काने मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी वाढली. तसेच अविनाश लोंढे यांच्या ही घरात घुसून कपाट, पेटी, डबे यांची मोडतोड करून काही चांदीची नाणे, रोख रक्कम चोरून नेली. त्यानंतर चोरांनी कल्याण-विशाखापट्टणम या महामार्गालगत असलेल्या उद्धव करांडे यांच्या घरामध्ये चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.दरम्यान उध्दव करांडे यांच्यासह घरातील अन्य सदस्य झोपलेल्या दोन खोलीला बाहेरु न लॉक करु न चोरट्यांनी स्वयंपाक घरात असलेल्या पेटी, डब्यातील २ तोळे सोने, २० हजारांची रक्कम असा एकूण ८० हजारांचा माल घेऊन चोर पळून गेले. हा प्रकार उध्दव करांडे यांच्या लक्षात पहाटे उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तसेच रु मचे दरवाजे बाहेरून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर उध्दव करांडे यांनी आरडाओरडा केली. शेजाऱ्यांनी असणाºया लोकांनी धाव घेऊन हा घडलेला प्रकार लक्षात आला. या चोरीच्या घटनेमुळे कोळगावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती चकलांबा पोलिसांना झाल्या नंतर पोलीस निरीक्षक विजय देशमुख, सिरसाट, नागरे यांनी भेटी देऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. परंतु चोरांचा ठोस शोध मात्र लागला नाही.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसtheftचोरी