शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा काही नेम नाही! धुलीवंदनादिवशी झेडपी शाळेत चोरीचा प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 12:28 IST

चोरी करण्यासारखे काही सापडले नसल्याने शाळेतील साहित्यांचे उलथापालथ करून चोरटे पसार 

- नितीन कांबळे कडा - चोर कधी काय करतील याचा नेम राहिला नाही. घरफोडी, मंदिरातील दानपेटी, वाहनचोरी, जनावरांच्या चोरी पाठोपाठ आता चक्क चिमुकल्याचे ज्ञानमंदिर असलेल्या शाळेत देखील चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यातील देवीनिमगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चोरते धुलीवंदना दिवशी चोरीच्या उद्देशाने कुलूप तोडून शिरले. मात्र, हाती काहीच  न लागल्याने साहित्यांची उचकापाचक करून चोरटे पसार झाले. 

आष्टी तालुक्यातील देविनिमगांव येथे पैठण बारामती रोडलगत पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. मंगळवारी धुलीवंदनाच्या शाळेस सुटी होती. हीच संधी साधत चोरट्यांनी दुसरीच्या वर्गाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. परंतु हाती काहीच न लागल्याने वर्गातील साहित्य व कागदांची उलथापालथ करून चोरटे पसार झाले. आज सकाळी शिक्षक शाळेत येताच हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक परसराम पोकळे यांनी सांगितले.

तीन वर्षांपूर्वी शाळेत झाली होती चोरीदरम्यान, या शाळेत ३ वर्षांपूर्वी चोरी झाली होती. एका वर्ग खोलीतून  गॅसटाकीसह शेगडी चोरीला गेल्याची घटना घडली होती. आता पुन्हा याच शाळेत चोरीचा प्रयत्न झाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड