शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईतील कोळगावात चोरट्यांचा धुमाकूळ, ५ घरे फोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 13:47 IST

पोलिसांनी श्वान पथकाच्या सहाय्याने तपास सुरु केला आहे

गेवराई (बीड ) : तालुक्यातील कोळगाव येथे मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पाच घरे फोडून चोरटे पसार झाले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

तालुक्यातील कोळगांव येथे मंगळवार रोजी मध्यरात्री चोरट्यांनी गावातील पाच घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अविनाश गवळी, सिंधूबाई काशिद यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील लोकांना  जाग आल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर चोरट्यांनी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मदनराव घाडगे यांच्या घराच्या पाठीमागील गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी  कपाट फोडून दागदागिने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र घाडगे यांच्या पत्नी जाग्या झाल्या. त्यांनी आवाज करताच चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून पळ काढला. तसेच अविनाश लोंढे यांच्या ही घरात घुसून कपाट,पेटी, डबे यांची मोडतोड करून काही चांदीची नाणे, रोख रक्कम चोरून नेली. 

त्यानंतर चोरांनी कल्याण-विशाखापट्टणम या महामार्गालगत असलेल्या उद्धव करांडे यांच्या घरामध्ये चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. दरम्यान उध्दव करांडे यांच्यासह घरातील अन्य सदस्य झोपलेल्या दोन खोलीला बाहेरुन लाँक करुन चोरट्यांनी स्वयंपाक घरात असलेल्या पेटी डब्यातील २ तोळे सोने, २० हजारांची रक्कम असा  ८० हजारांचा ऐवज घेऊन चोर पळून गेले. हा प्रकार उध्दव करांडे यांच्या लक्षात पहाटे पहाटे उठल्यानंतर आला. तसेच रुमचे दरवाजे बाहेरून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर उध्दव करांडे यांनी आरडाओरडा केली. यानंतर शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. 

घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी स्थानकातील पोलीस निरीक्षक विजय देशमुख, सिरसाट, नागरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. परंतु चोरांचा मग लागला नाही. 

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी