शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

'...त्यांच्यामुळे हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ'; बीडमध्ये संतप्त कार्यकर्त्याचा नेत्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 12:49 IST

भीमाशंकर शुगर्सचे चेअरमन नितीन लोढांवर गावातील त्यांच्याच कार्यकर्त्याने प्राणघातक हल्ला केला.

बीड: तालुक्यातील चौसाळा येथील माजी आमदार स्व. चांदमल लोढा यांचे नातू व भीमाशंकर शुगर्सचे चेअरमन नितीन लोढा (३२)  यांच्यावर गावातीलच तरुणाने धारदार शस्त्राने वार केला. यात नितीन लोढा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबादेत खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. ही घटना ६ जून रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. दरम्यान, हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून  निषेधार्थ ७ जून रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोर हा लोढा यांचा कार्यकर्ता असून नेत्याने दुर्लक्ष केले, अपमानस्पद वागणूक दिली यामुळे हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, नितीन लोढा हे ६ जून रोजी नात्यातील एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. रात्री साडेनऊ वाजता लोढा कुटुंबीय घरी परतले. रात्री साडेदहा वाजता गावातीलच रणजित गुंजाळ याने नितीन लोढा यांना फोन करुन भेटायचे असल्याचे सांगितले. त्यांनी सकाळी भेटू असे सांगितल्यावर मी घराकडे येत आहे, तात्काळ भेटायचे आहे, असे त्याने सांगितले. त्याला भेटण्यासाठी नितीन लोढा हे घराबाहेर येताच दुचाकीवरुन आलेल्या रणजित गुंजाळने सत्तूरने  वार केला. यात लोढा यांच्या चेहऱ्रूावर जखम झाली. आरडाओरड केल्यावर दुचाकी तेथेच सोडून त्याने बाह्यवळण रस्त्याने पोबारा केला.

परिसरातील तरुणांनी त्यास पकडून चोप दिला. नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक अजय पानपाटील व सहकाऱ्रूयांनी त्याला ताब्यात घेतले. हल्ल्यात वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे. जखमी लोढा यांना सुरुवातीला बीडच्या खासगी दवाखान्यात दाखल केले, उशिरा औरंगाबादला हलविले.  त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपनिरीक्षक अजय पानपाटील हे जबाब नोंदविण्यासाठी औरंगाबादला रवाना झाले आहेत.  गुन्हा नोंदवून पुढील कारवाई केली जाईल, असे सहायक निरीक्षक शेख मुस्तफा यांनी सांगितले.

चौसाळ्यात स्वयंस्फूर्तीेने बंदनितीन लोढा हे बालाघाटावरील बडे प्रस्थ आहे. पारगाव (जि.उस्मानाबाद) येथील भीमाशंकर शुगर्स कारखान्याने ते चेअरमन असून त्यांच्या पत्नी चौसाळ्याच्या माजी सरपंच आहेत. आ.विनायक मेटे यांना रामराम ठोकून नुकताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनीआज स्वयंस्फूर्तीने व्यापारपेठ बंद ठेवली आहे. 

अपमानास्पद वागणुकीमुळे हल्लारणजित गुंजाळ हा नितीन लोढा यांचाच कार्यकर्ता आहे. तो सध्या बीडमध्ये एका हॉटेलात काम करतो. लोढा यांनी दुर्लक्ष केले, अपमानास्पद वागणूक दिली यामुळे हल्ला केल्याचा खुलासा त्याने चौकशीत केला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड