शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

"२५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत..."; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 18:27 IST

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत, यावरुन आता जरांगे पाटील यांनी मंत्री मुंडे यांच्यावर टीका केली.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे  सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना शिक्षा देण्याची मागणी सुरू आहे. या मागणीसाठी राज्यभरात मूक मोर्चे सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी परभणी येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. या विधानाच्या निषेधार्थ आता ओबीसी समाजाकडून आंदोलन सुरू आहेत. जरांगे पाटील ंयांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी सुरू आहे. यावरुन आता मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. 

बाबा सिद्दीकी यांची हत्या का केली, कोणी सुपारी दिली होती? पोलिसांच्या चार्जशीटमधून मोठा खुलासा

'मंत्री धनंजय मुंडे राज्यात जातीयवाद करत आहेत, ते टोळ्या पाळत आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. आमची लढाई आरक्षणाचीच आहे पण तुम्ही लोकं मारून टाकायला लागल्यानंतर बोलायचं नाही का? यात जातीचा संबंध आला कुठुन? असा सवालही जरांगे पाटील यांनी केला.

धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, ही तत्परता धनंजय मुंडे आणि त्यांनी टोळ्या पाळल्या आहेत.लोकांच्या पोरांची हत्या करण्यासाठी, खंडणी वसुल करण्यासाठी. ही तत्परता त्यांनी त्यावेळी दाखवायला हवी होती. संतोष देशमुख यांचा मृतदेह दोन दिवस केज येथील रुग्णालयात पडून होता. त्यावेळी मस्साजोग गाव रस्त्यावर होते, त्यांनी तत्परता दाखवायला हवी होती. त्यांचे गुंड लोक देशमुख यांच्या भावाला धमक्या द्यायला लागले, तरीही आम्ही बोलायचं नाही का? असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

"धनंजय देशमुख आज न्यायासाठी फिरत आहे. त्यांना न्याय कधी मिळणार? आम्ही त्यांच्या न्यायासाठी बोलायचं नाही का? त्यांच्या जातीच्या लोकांना यांना न्याय मिळावा असं वाटत नाही का? या घटनेत जातीच काय आलं?, असंही जरांगे पाटील म्हणाले. धनंजय मुंडे राज्यात टोळ्या पाळत आहेत, जातीयवाद करत आहेत, असा आरोपही केला. मी गुंडांना बोललो, कुठल्या जातीला बोललो नाही, या प्रकरणात मराठा, ओबीसी संबंध येतो कुठे?, असंही जरांगे पाटील म्हणाले.

परळी, बीड, अंबाजोगाईनंतर धारूरमध्ये जरांगेंवर गुन्हा नोंद

संतोष देशमुख हत्या प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी परभणी येथे निघालेल्या मोर्चानंतर उपस्थित जनतेला संबोधित करताना धनंजय मुंडे यांचा नामोल्लेख करत व मराठा आणि वंजारा समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ भाषण मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. बीड जिल्ह्यातील वंजारा समाजसह ओबीसी समाजाने याचा निषेध नोंदवत मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी आक्रमक झाल्याचे पाहिला मिळत आहे. परळी येथील शिवाजीनगर पोलीसांत सात तास हे आंदोलन केल्यानंतर जरांगे यांच्या विरोधात अदाखलपत्र गुन्हा दाखल झाला होता. धारूर येथेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDhananjay Mundeधनंजय मुंडे