शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बीड जिल्ह्यातील ५ तालुके होणार पाणीदार; समृद्ध ग्राम योजनेत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 4:59 PM

या गावांना भेटी देऊन पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी नुकतेच मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देपाच तालुक्यांमधील १२७ गावे स्पर्धेसाठी पात्र ठरणार

धारूर (जि.बीड) : पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध ग्राम स्पर्धा राज्यात राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रातून ४० तालुक्यांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यात बीड जिल्ह्यातील ५ तालुक्यांचा समावेश असून स्पर्धेच्या माध्यमातून ही गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहेत. या गावांना भेटी देऊन पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी नुकतेच मार्गदर्शन केले.

पाणी फाऊंडेशनच्या वतीने राज्यात वॉटर कप स्पर्धेत काम केलेले बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, केज, धारूर आणि आष्टी या पाच तालुक्यांमधील १२७ गावे या स्पर्धेसाठी पात्र असणार आहेत. धारूर तालुक्यातील आमला, देवठाणा, अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ, धानोरा बीड तालुक्यातील मांडवखेल, देवऱ्याचीवाडी, केज तालुक्यातील बनसारोळा, आवसगाव, पळसखेडा, दीपेवडगाव व आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, सराटे वडगाव या गावांमध्ये समृद्ध गाव स्पर्धेसाठी गावसभा घेण्यात आल्या. त्यादरम्यान सत्यजित भटकळ यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. आता प्रवेश फॉर्म भरून घेण्याची प्रकिया सुरु आहे.

मार्च व एप्रिल महिन्यांत ४ दिवसाचे निवासी प्रशिक्षण पाच ते सात गावकऱ्यांना देण्यात येणार आहे, त्याचा लाभ गावकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी मार्गदर्शन केले. शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, गावातील लोक एकत्र येऊन कसा चमत्कार घडवू शकतात, हे या स्पर्धेमधून बळीराजा समृद्ध करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

१८ महिन्यांत करावे लागणार सामूहिक  प्रयत्नया गावांमध्ये जल व्यवस्थापन, कृषी उत्पादन वाढ, आर्थिक सुबत्ता आणण्याच्या दृष्टिकोनातून रोपांची लागवड व संगोपन करणे, गवताची लागवड करणे, मातीचा सेंद्रिय पोत सुधारण्यासाठी १८ महिन्यांच्या कालखंडात या स्पर्धेच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. च्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्नांतून यशाचा मार्ग स्वीकारावा या उद्देशाने नुकताच पाणी फाऊंडेशनचे सीईओ सत्यजित भटकळ यांनी दौरा केला आणि ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :BeedबीडWaterपाणीdroughtदुष्काळ