शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

२५ वर्षांत कधी नव्हते असे पीक आले पण दृष्ट लागली...स्वप्नांवर पाणी फिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 13:18 IST

पावसाने सर्व काही संपल्याने शेतकऱ्यांसह मजुरांवर उपासमारीची वेळ

ठळक मुद्देमाजलगाव तालुक्यातील घळाटवाडीच्या शेतकऱ्यांची व्यथा

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव (जि. बीड) :  मागील २५ वर्षांत कधी नव्हती अशी पिके आल्याने किती माल निघेल आणि  किती नाही, असे वाटत असताना दृष्ट लागल्यासारखे झाले. २०-२५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सर्व काही संपल्याने शेतकऱ्यांसह मजुरांवर उपासमारीची वेळ आल्याचे सांगताना  तालुक्यातील घळाटवाडीचे शेतकरी रडकुंडीला आले होते.  

प्रस्तुत प्रतिनिधीने पाहणी केली असता शेतकरी त्यांच्या व्यथा मांडत होते. घळाटवाडी परिसरात  चार- पाच वर्षांपासून सतत पडत असलेला दुष्काळामुळे शेतकरी मेटाकुटीला आले होते. मात्र यावर्षी अनियमित असूनही गरजेच्या वेळी पडलेल्या पावसामुळे पीक परिस्थिती अतिशय उत्तम होती. सोयाबीन व बाजरी  काढायला आली होती तर कापूस फुटला होता. परंतु २०-२५  दिवसांपासून  मुसळधार पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. या गावच्या उत्तरेला असलेल्या घळाटी नदीला अनेक वेळा पूर आल्याने आजूबाजूच्या शेकडो हेक्टर जमिनीतील वाहून गेलेली पिके नदीकाठच्या बाभळीच्या झाडांना अडकलेली होती. तर  सोयाबीन खाली गळाल्याने अनेक शेतात सोयाबीन पुन्हा उगवलेले दिसले.  काही शेतकऱ्यांनी थोडाफार वेचलेला कापूस वाळू घातला, पण त्याच्याही फकड्या झाल्या होत्या.

स्वप्नांवर पाणी...मी मागील चाळीस वर्षांपासून शेती करीत असून माझ्या बघण्यात अशी पिके आली नाहीत. ५-६ वर्षांच्या दुष्काळानंतर चांगली पिके आल्याने यावर्षी आपण कर्जमुक्त होऊ, असे वाटले होते; परंतु हे नियतीला मान्य नव्हते. माझ्याकडे सोळा एकर जमीन असून, दहा ते बारा लोकांची उपजिविका शेतीवर अवलंबून होती. महिन्यापासून हाताला काम नाही. आता काय खावे, अशी अवस्था झाल्याचे प्रकाश माने म्हणाले.  मागील अनेक दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने शेतात ओल असल्याने शेतात काम करणे अवघड झाले. महिन्यापासून आम्हाला रोजगार मिळत नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे गणेश माने व शाम काळे यांनी सांगितले. ओला कापूस वेचायलाही मजूर मिळणे अवघड झाले आहे, असे शेतकरी केशव पठाडे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीBeedबीडRainपाऊस