शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

बीडमध्ये खळबळ; सरकारी वकिलानंतर आता वैद्यकीय अधिकाऱ्याने संपवलं जीवन, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:32 IST

वैद्यकीय अधिकाऱ्याने तलावात उडी घेऊन संपवले जीवन, वडवणी तालुक्यातील देठेवाडी येथे घडली घटना

वडवणी (बीड): येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम यादव (वय २९) यांनी देठेवाडी गावाजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केली. शनिवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. या घटनेमुळे वडवणी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मूळचे अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील असलेले डॉ. शुभम यादव यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून बीड येथे वास्तव्यास होते. वडवणी येथे ते एकटेच एका खोलीत राहत होते. शुक्रवारी दुपारी एका हॉटेल चालकाशी बोलताना त्यांनी आपण डोंगर आणि निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जात असल्याचे सांगितले. मात्र ते परत न आल्याने त्यांच्या वडिलांनी वडवणी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. हॉटेल चालकाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी डोंगराळ भागात शोध घेतला असता, देठेवाडी येथील तलावात डॉ. शुभम यांचा मृतदेह आढळला. पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीने रात्री ९ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

कारण अद्याप अस्पष्टरविवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला. वडवणी पोलिसांनी या प्रकरणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. डॉ. शुभम यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केली असावी असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. दरम्यान, १५ दिवसांपूर्वीच येथील सरकारी वकील विनायक चंदेल यांनीही न्यायालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या