शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सॅम्पल घ्यायला इन्स्पेक्टरच नाही; मग कशा शोधणार बनावट गोळ्या, औषधे?

By सोमनाथ खताळ | Updated: December 13, 2024 11:53 IST

राज्यात औषध निरीक्षकांची २०० पैकी ११९ तर सहायक आयुक्तांची ६७ पैकी ४२ पदे रिक्त

बीड : राज्यात बनावट औषधे, गाेळ्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी सामान्य रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडला आहे. औषध विभागाकडे सॅम्पल घेण्यासाठी औषध निरीक्षक आणि घेतलले सॅम्पल तपासायला शास्त्रज्ञ नसल्यानेच या बनावट कंपन्यांचे फावत असल्याचे समोर आले आहे. सॅम्पल घ्यायला इन्स्पेक्टरच नाहीत मग बनावट, गोळ्या औषधे कशी शोधणार? असा प्रश्न आहे. राज्यात सहायक आयुक्तांची ४२ तर औषध निरीक्षकांची तब्बल ११९ पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे.

अंबाजोगाई स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात ‘ॲझिथ्रोमायसीन ५००’ या बनावट गोळ्यांचा पुरवठा झाल्याचे प्रकरण आठवड्यापूर्वी उघड झाले होते. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हाही दाखल झाला. या रुग्णालयात कोल्हापूरमधील मे. विशाल एन्टरप्रायजेसकडून गोळ्यांचा पुरवठा झाला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये अन्न प्रशासनाने या गोळ्यांचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. परंतु, याचा अहवाल येण्यासाठी ऑक्टोबर २०२४ उजाडले. या आधीही या कंपनीने ठाणे, नागपूरसह इतर ठिकाणी बनावट गोळ्यांचा पुरवठा केल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यातील रुग्णांच्या जीवाशी खेळ मांडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करण्याची मागणी जोर धरू लागली होती. परंतु, हे सर्व बनावट प्रकार उघड करण्यासाठी औषध प्रशासनाकडे पुरेसे मनुष्यबळच नसल्याचे उघड झाले आहे.

का होतो अहवाल यायला उशीर?राज्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे सध्या प्रयोगशाळा आहेत. याठिकाणी असलेल्या वैज्ञानिक अधिकारी ४४ पैकी २०, वरिष्ठ तांत्रिक सहायक ४५ पैकी ३७ आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ ४० पैकी २१ अशी पदे रिक्त आहेत. त्यामुळेच अहवाल येण्यास उशीर होतो. त्यातही सॅम्पलची संख्या मोठ्या प्रमाणात असते. राज्यभरातून आलेले सॅम्पल हे या तीनच प्रयोगशाळांत तपासले जातात.

केवळ ८१ निरीक्षक कर्तव्यावरफिल्डवर जाऊन काम करणारे पद म्हणजे औषध निरीक्षक आहे. परंतु, राज्यातील २०० पैकी ८१ निरीक्षकच कर्तव्यावर आहेत. तब्बल ११९ पदे ही रिक्त आहेत. अनेक जिल्ह्यांत एकही निरीक्षक नाही. त्यामुळे आहे त्या अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढत आहे. ही सर्व पदे एमपीएससीमार्फत भरली जातात.

जाहिरात निघाली, नव्या वर्षात भरणार पदेप्रयोगशाळेच्या वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ या पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. याची परीक्षाही ३० व ३१ डिसेंबर रोजी होईल. त्यानंतर गुणवत्ता यादी लावून ही रिक्त पदे भरले जातील. औषध निरीक्षकांची पदे एमपीएससीमार्फत भरली जातात. त्यावर शासनाने लवकर निर्णय घ्यावा, अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

अशी आहेत महत्त्वाची रिक्त पदेपद - मंजूर - रिक्तसहायक आयुक्त - ६७ - ४२औषध निरीक्षक - २०० - ११९

तीन प्रयोगशाळांतील रिक्त पदेपद - मंजूर - रिक्तवरिष्ठ तांत्रिक सहायक - ४५ - ३७विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ - ४० - २१वैज्ञानिक अधिकारी - ४४ - २०

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी