शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

दवाखान्यातून परतताना टँकरचा दुचाकीला धक्का; आजारी पत्नीचा चिरडून मृत्यू, पती जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:12 IST

आष्टी तालुक्यातील कडा येथील घटना, टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात

- नितीन कांबळेकडा ( बीड): दवाखान्यातून घरी परतत असताना दुचाकीला टँकरच्या पाठीमागील बाजूची धडक बसून टायरखाली आल्याने आजारी पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना कडा येथील केरूळ चौकात गुरूवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली. सुक्षला महादेव आंधळे ( ६५, रा.लिंबोडी) असे मृत महिलेचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील महादेव आंधळे हे आज सकाळी आजारी पत्नीस कडा येथील एका खाजगी दवाखान्यात घेऊन गेले होते. उपचार घेतल्यानंतर आंधळे पत्नीस दुचाकीवर ( एम.एच २३, बी.ई. ६०१०) घेऊन घरी परतत होते. दरम्यान, सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथील दुध संकलन क्रेंदातून एक टँकर ( एम.एच १६,सी.सी.९०९९) कडाकडे जात होते. केरूळ चौकात टँकरच्या पाठीमागील बाजूचा धक्का लागल्याने आंधळे यांचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटले. यावेळी सुक्षला महादेव आंधळे यांचा टँकरच्या टायरखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. तर पती महादेव केराजी आंधळे हे गंभीर जखमी झाले. कडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन टॅकर चालकाला ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी आंधळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीड