शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा संपली; बीड पोलिस उभारणार नवीन घरात गुढी, २४१ घरांचे काम पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:25 IST

आठवडाभरात घरे वाटपाला होणार सुरुवात

बीड : मुख्यालयासह बीड उपविभागातील २४१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता नवीन घरात जायला मिळणार आहे. पाेलिस मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या टोलेजंग इमारतींची कामे पूर्ण झाली असून ३० मार्च रोजी पाडव्याच्या दिवशी नवीन घरातच पोलिस दादा, ताई हे गुढी उभारणार आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या बाजूसह इतर ठिकाणची पोलिसांची निवासस्थाने मोडकळीस आल्याने राहण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना किरायाच्या घरात राहावे लागत होते. हाच धागा पकडून २०१९ साली पोलिसांसाठी निवासस्थाने मंजूर झाली. पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळांतर्गत ६० कोटींची निविदा निघाली. पुण्याच्या धनश्री बिल्डकॉन यांनी ती ५२ कोटी रुपयांमध्ये घेतली. हे काम २०२२ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु कोरोनाचे कारण देत कंत्राटदाराने याला उशीर केला. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला दंडही ठोठावला. अखेर या घरांचे काम आता पूर्ण झाले असून, गुढीपाडव्याआधीच सर्वांना नवीन घरात राहायला मिळणार आहे.

विजेसह इतर कामे पूर्णजानेवारी महिन्यातच ही सर्व घरे मिळणे अपेक्षित होते. परंतु, विजेचा प्रश्न मिटला नव्हता. तसेच इतर अंतर्गत कामेही अपूर्ण होती. त्यामुळेच दोन महिने उशीर झाला. आता सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नवीन घरात राहायला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यालयासह एक इमारत ताब्यातपोलिस मुख्यालयाची इमारत यापूर्वीच ताब्यात घेतली आहे. तर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठीची ४२ घरांची एक पाच मजली इमारतही ताब्यात घेतली आहे. दोन दिवसांत घरे वाटप होतील. इतर इमरातीमध्येही आठवडाभरात घरे वाटपाचे काम हाती घेतले जाणार आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनीही याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत गृहचे उपअधीक्षक उमाकांत कस्तुरे, गृह निर्माण विभागाचे कनिष्ठ अभियंता के. पी. देशमुख, कार्यालयीन अधीक्षक नरसिंह कासेवाड, लिपिक विष्णू काकडे आदी होते.

कोणासाठी किती घरे?टाइप-२ मध्ये एकूण पाच इमारती आहेत. प्रत्येक इमारत सात मजली असून एका इमारतीत २ बीएचके ४२ अशी २१० घरे आहेत. हे सर्व कर्मचाऱ्यांसाठी असतील. टाइप- ३ मध्ये १ इमारत असून २ बीएचके २८ घरे आहेत. ती अधिकाऱ्यांसाठी असतील. टाइप- ४ मध्ये ३ बीएचके अशी तीन घरे असतील. ते सर्व उपअधीक्षक यांच्यासाठी असतील. सर्वच इमारतींमध्ये लिफ्टची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पोलिस मुख्यालयाची इमारतही तयार झाली आहे. ज्यात राखीव पोलिस निरीक्षक कक्ष, शस्त्रागृह, शस्त्र दुरुस्ती गृह आदींचा समावेश आहे.

पाठपुरावा सुरूनिवासस्थानांसह इतर इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत. मुख्यालय व टाइप-२ मधील एक इमारत ताब्यात घेतली आहे. इतरही ताब्यात घेऊन आठवडाभरात सर्व घरे वाटप केले जातील. आमचा पाठपुरावा सुरूच आहे.-नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस