शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याला पुढे करत चुलत्याने मिळविली उमेदवारी; नको नको म्हणणारे प्रकाश सोळंके पुन्हा मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 19:09 IST

मागील विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात प्रत्येक सभेदरम्यान ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत निवडून देण्याचे भावनिक आवाहन करत विजय मिळवला होता.

- पुरुषोत्तम करवामाजलगाव : दोन महिन्यांपूर्वी येथील आमदार प्रकाश सोळंके यांनी ‘मी ही निवडणूक लढविणार नसून, माझा पुतण्या जयसिंह सोळंके यांना सहकार्य करा’, असे आवाहन अनेक सभेत केले होते. पुतण्याचे नाव पुढे करत स्वतःच तिकीट मागत त्यांनी उमेदवारी पदरात पाडून घेतली. यामुळे माजलगाव मतदारसंघात पुतण्यावर चुलता भारी ठरल्याची चर्चा होत आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपचे रमेश आडसकर यांच्या उमेदवारीमुळे विजय मिळवणे जड जात होते. त्यामुळे प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात प्रत्येक सभेदरम्यान ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत निवडून देण्याचे भावनिक आवाहन केले होते. यामुळे सोळंके यांना सहानुभूती मिळाली होती. तरीही नवखे रमेश आडसकर यांनी चांगली लढत दिली. केवळ ११ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतरही गत पाच वर्षांत एकही दिवस मतदारसंघ सोडला नाही व कायम जनतेच्या संपर्कात राहिले.

सात-आठ महिन्यापूर्वी मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाच्या विरोधात आ. प्रकाश सोळंके यांनी अपशब्द वापरल्यामुळे मराठा युवकांनी त्यांचे संपूर्ण घर जाळून टाकले होते. मराठा समाज आपल्या विरोधात आहे व पुतण्या जयसिंह सोळंके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारी मागितली होती. ही गोष्ट कानावर पडताच प्रकाश सोळंके यांनी त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके यांचे नाव पुढे करत मराठा समाजामधून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. पुतणे जयसिंह सोळंके यांनीही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ जयसिंह सोळंके यांनीच मागणी केल्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. परंतु, प्रकाश साेळंके यांनी पुतण्याऐवजी स्वतःसाठी उमेदवारी मिळवली. पुतण्याने इकडे तिकडे उमेदवारी मागितल्यास आपली अडचण होईल. यामुळे दोन महिन्यांपासून जयसिंग सोळंके यांचे नाव पुढे करत त्यांना चांगलेच झुलवत ठेवल्याचे दिसले. चुलत्याकडूनच धोका मिळाल्यामुळे यापुढे जयसिंह सोळंके काय निर्णय घेतात, याकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

चेअरमन पदाचे गाजर देणार?एक वर्षापूर्वी तेलगाव येथील सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चेअरमन पदावर हक्क सांगणारे जयसिंह यांना प्रकाश सोळंके यांनी विधानसभा लढवण्याचे गाजर दाखवत व्हाइस चेअरमन केले व स्वतःच्या मुलाला चेअरमन केले होते. तिकीट न मिळाल्यामुळे सध्या नाराज असलेले जयसिंह सोळंके यांना या कारखान्याचे चेअरमनपद देऊन त्यांना शांत केले जाऊ शकते, असे राजकीय जाणकार बोलून दाखवत आहेत. त्यामुळे नाराज जयसिंह सोळंके हे अपक्ष निवडणूक लढवत चुलत्याला पाडण्यासाठी पुढे येतात की, चेअरमनपद मिळवितात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmajalgaon-acमाजलगांवPrakash Solankeप्रकाश सोळंकेNCPराष्ट्रवादी काँग्रेस