शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा घरफोडी करून चोर शेतात लपला; पाठलाग होताच घाबरून घेतली थेट विहिरीत उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 19:14 IST

पाडळसिंगीत घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यास पकडले

बीड : गेवराई  तालुक्यातील पाडळसिंगी येथे एका वस्तीवर भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडताना आरोपीला मुलांनी पाहिले. ते ओरडताच तो वाऱ्याच्या वेगाने धावत शेतात लपला. वस्तीवरील लोकांनी पाठलाग केल्यावर त्याने थेट विहिरीत उडी घेतली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या साहाय्याने त्यास विहिरीबाहेर काढून बेड्या ठोकल्या. २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता हा प्रकार घडला.

टोण्या ऊर्फ सोपल भाऊसाहेब काळे (२४,रा. पिंपळगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद, मूळ गाव लखमापुरी ता. शेवगाव, जि. अहमदनगर) असे त्या आरोपीचे नाव आहे. प्रभू सखाराम दाभाडे (रा. पाडळसिंगी) हे वस्तीवर वास्तव्यास आहेत. २० रोेजी ते शेतात कुटुंबासह कामासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत टोण्या काळे याने मोठ्या कटावणीने कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. याच वेळी मुलांनी त्यास पाहिले. त्यांना पाहून तो शेतात पळाला व दडून बसला. मुलांनी फोन करून प्रभू दाभाडे यांना कळविल्यावर ते वस्तीकडे आले. तोपर्यंत वस्तीवरील इतरांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र, लोकांच्या तावडीत न सापडण्यासाठी शेतातून बाहेर येत तो धावत सुटला. टोण्या पुढे व ग्रामस्थ मागे, असा खेळ रंगला. इतक्यात त्याने पाण्याने भरलेल्या एका विहिरीत उडी घेतली. पाण्यावर तरंगत विहिरीत तो लपून बसला. यानंतर गेवराई पोलिसांना पाचारण केले. प्रभू दाभाडे यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

एक दिवसाची पोलीस कोठडीआरोपी टोण्या ऊर्फ सोपल काळे यास २१ रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्याकडून कटावणी हस्तगत केली आहे. त्याच्यावर आष्टीत चोरीचा, तर शेवगाव (जि. अहमदनगर) येथे बलात्काराचा गुन्हा नोंद आहे. अधिक तपास सुरू असल्याचे सहायक उपनिरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड