शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्राने जीव धोक्यात घातला; जखमी ९ फुटी अजगराला विहिरीतून काढत दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 15:50 IST

शेतातील विहिरीतमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ९ फुटाचा अजगर जाळीत जखमी अवस्थेत अडकला होता.

- सखाराम शिंदे गेवराई (बीड) : तालुक्यातील पांढरवाडी येथील एका शेतकऱ्यांच्या विहिरीत गेल्या तीन दिवसांपासून एक अजगर जाळीत अडकून पडले होते.  जखमी झालेल्या या तब्बल ९ फुटाच्या अजगराची गुरुवारी रात्री  येथील सर्वमित्राने मोठ्या प्रयत्नातून सुटका केली. अजगराला वनाधिकारी यांच्या समवेत वनक्षेत्रात सोडण्यात आले.

साप दिसला कि सर्वसामान्य नागरीकाच्या अंगावर काटा येतो व फितीने घाबरून जातो. तालुक्यातील पांढरवाडी येथील शेतकरी सुखदेव जाधव यांच्या शेतातील विहिरीतमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तब्बल ९ फुटाचा अजगर जाळीत जखमी अवस्थेत अडकला होता. शेतकऱ्यांने सर्पमित्र बप्पा कानाडे यांना याची माहिती दिली. 

त्यानंतर सर्पमित्र बप्पा कानाडे, राहुल शेलार, प्रेम वाघमारे, बाळु राऊत व शेतकरी विहिरीजवळ पोहचले. सर्पमित्र कानाडे जीव धोक्यात घालून पाण्यात उतरले. मोठ्या शिताफीने अडकलेल्या अजगराला त्यांनी सुखरूप बाहेर काढले. अजगरावर योग्य उपचार करण्यात आले. वन अधिकारी लक्ष्मण गाडे यांच्या समवेत अजगराला पालख्या डोगराजवळील वनक्षेत्रात सोडून देण्यात आले. सर्पमित्राने जीव धोक्यात घालून केलेल्या प्रयत्नांमुळे जखमी अजगराला जीवदान मिळाले. त्यामुळे सर्पमित्राचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :BeedबीडforestजंगलFarmerशेतकरी