शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या ऊसतोड महिलांची गर्भपिशवी काढल्याचा मुद्दा दिल्लीत गाजला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:35 IST

महाराष्ट्र शासनाकडूनही गंभीर दखल; महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी बुधवारी राज्यसभेत यावर लेखी माहिती देत खुलासा केला.

बीड : जिल्ह्यातील ८४३ महिलांची २०२५ पूर्वीच्या अनेक वर्षांत गर्भपिशवी काढल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला होता. या मुद्यावर ‘लोकमत’ने २ जून रोजी वृत्त प्रकाशित करत प्रकाश टाकला होता. त्यानंतर शासन आणि आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. पत्र काढत बैठकाही घेतल्या. त्यावर बीडच नव्हे, तर राज्याचा आरोग्य विभागही सतर्क झाला. आता हाच मुद्दा दिल्लीत संसदेतही गाजला आहे. महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी बुधवारी राज्यसभेत यावर लेखी माहिती देत खुलासा केला.

ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीडमधून प्रत्येक वर्षी १ लाख ७५ हजार मजूर ऊसतोडीला जातात. यापैकी ७८ हजार महिला, तर ९६ हजार पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ८४३ महिलांची ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचे समोर आले होते. यात ३० ते ३५ वयोगटातील ४७७ महिलांचा समावेश होता. तसेच १५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड झाले होते. यावरच प्रकाश टाकल्यावर आरोग्य विभागाने याबाबत सहकार, कामगार, आरोग्य विभागासह इतर संंबंधित विभागांना कडक सूचना देत सतर्कता बाळगण्यास सांगितले होते.

८४३ शस्त्रक्रिया कधी झाल्या?जिल्ह्यातील ८४३ गर्भपिशवी शस्त्रक्रियांचा खुलासा आरोग्य विभागाने केला. यात २०१९ नंतर २६७ आणि त्यापूर्वी ५७६ शस्त्रक्रिया झाल्याची नाेंद आहे. तसेच कोणत्या वर्षी किती झाल्या, याचीही माहिती घेतली जात आहे. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

काय म्हणाल्या ठाकूर?बीड जिल्ह्यात २०२२-२५ दरम्यान २११ महिलांच्या गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया झाल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. वैद्यकीय गरजेपोटी झालेल्या या शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीनेच होतात. ऊसतोड कामगारांमधील अडचणींवर उपाय म्हणून, राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी आरोग्य तपासणी आणि प्रजनन आरोग्य जनजागृती मोहीम राबवली आहे, ज्यात अनावश्यक शस्त्रक्रियांचे धोके आणि कुटुंब नियोजन पद्धतींचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले.

आता खात्री करूनच परवानगीजून महिन्यात हा मुद्दा समोर आल्यानंतर आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे. खासगीतून आलेल्या प्रस्तावाची उलट तपासणी करून गरज असेल तरच परवानगी दिली जात आहे. अनावश्यक शस्त्रक्रिया होणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही याबाबत राज्यस्तरावर बैठक घेतली होती.

कारवाई केली जाते२०१९ मध्ये ठरलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार महिला रुग्ण आल्यावर स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी होते. त्यानंतरच गरज असेल तर शस्त्रक्रियासाठी परवानगी दिली जाते. जसे जिल्हास्तरावर आहे, तसेच तालुकास्तरावरही कारवाई केली जाते.- डॉ. संजय राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेWomenमहिला