शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परळी रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार, अमृत योजनेत झाला समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:08 IST

रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी  मंत्रालयाने अमृतभारत स्टेशन योजना जाहीर केली आहे

- संजय खाकरेपरळी: अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश झाल्याने परळी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 13 कोटी पाच लाख 39 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे .या निधीतून परळी रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात परळी सह 16 रेल्वे स्टेशनचा अमृतभारत स्टेशन योजनेमध्ये समावेश केला आहे.

रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी  मंत्रालयाने अमृतभारत स्टेशन योजना जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता ऑनलाईन (व्हिडिओ कॉनफ्रंसद्वारे )अमृत भारत स्टेशनच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे . परळी येथील रेल्वे स्टेशनचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. येथील रेल्वे स्टेशन वर सहा ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमास बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाचे रेल्वे प्रबंधक भरतेश कुमार जैन यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. 

अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये हैदराबाद, काझीपेठ, बिदर, जहिराबाद, परळी वैजनाथ, तांडूर, करीमनगर सह 16 रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. या रेल्वे स्टेशनमध्ये नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा, परिसर सुशोभीकरण प्रतीक्षागृह उभारणे -सुधारणा ,स्वच्छता गृहामध्ये सुधारणा व व अन्य विकास कामे करून रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्यात येणार आहे. 

स्थानकाचा चेहरामोहरा बदलेलअमृत भारत स्टेशनमध्ये परळी रेल्वे स्थानकाचा समावेश झाला आहे. 13 कोटी पाच लाख 39 हजार रुपये खर्च करून रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे परळी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलेल. - संतोष चिघळे ,रेल्वे वाणिज्य अधिकारी परळी

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनBeedबीड