शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चप्पल घेतली नाही, म्हणून चिमुकल्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 09:31 IST

युवराज श्रीमंत मोरे (रा. बोडखा कासारी, ता. धारूर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे

संतोष स्वामी दिंद्रूड (जि. बीड) : पहिली चप्पल खराब झाली. त्यामुळे नवी चप्पल घेण्यासाठी आजीकडे हट्ट धरला. परंतु तो पूर्ण न केल्याने अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्याने आजीच्या साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही घटना धारूर तालुक्यातील हिंगणी खुर्द येथे सोमवारी सायंकाळी घडली.  

युवराज श्रीमंत मोरे (रा. बोडखा कासारी, ता. धारूर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे आई-वडील ऊसतोड मजूर आहेत. त्यामुळे तो आजोळी हिंगणी खुर्द येथे विश्वनाथ उजगरे या आजोबांकडे आला होता. युवराजचा स्वभाव हा चिडचिडा आणि रागीट असल्याचे सांगण्यात आले. सोमवारीही सकाळपासूनच त्याने चिडचिड करायला सुरुवात केली होती. त्याचे आई-वडील हिंगणीपासून अवघ्या दोन किती अंतरावर ऊसतोडणी करीत होते. त्यांच्याकडे जातो म्हणून तो  दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडला आणि जवळच असलेल्या लिंबाच्या छोट्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.    

लहान मुलांमध्ये हट्टीपणा असतो. हट्ट पुरविला नाही तर ते चिडचिड करतात, रागीट बनतात. अशा मुलांना ‘इम्पलसिव डिसऑर्डर व बिहेव्हिअरल डिसऑर्डर’ असा आजार असू शकतो. मुलांची वर्तणूक, चिडचिडेपणा, राग येणे, स्वत:सह इतरांना इजा करणे अशी लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.   - डॉ. मोहमंद मुजाहेद, मानसोपचारतज्ज्ञ, बीड

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिस