शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताच्या थारोळ्यात आढळेल्या मृतदेहाची ओळख पटेना; खुनाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 14:53 IST

वेलतुरी शिवारात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

- नितीन कांबळे कडा ( बीड) : म्हसोबावाडी-सावरगाव रस्त्यावरील वेलतुरी शिवारात गुरूवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शवविच्छेदनानंतर अज्ञात आरोपी विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृताची ओळख अद्याप पटली नाही. 

आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी-सावरगाव रस्त्यावरील वेलतुरी शिवारातील शेतात १६ फेब्रुवारी रोजी एका ३५ वर्षीय तरूणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. मृताच्या ओळख अद्याप पटली नाही. दरम्यान, बीड जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनानंतर तरूणाच्या डोक्यात खोलवर जखम असल्याचे निष्पन्न झाले. यावरून रविवारी अंभोरा पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार लुईस पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे करीत आहेत.

मृतदेहाची ओळख पटेनाअंभोरा पोलीस ठाणे हद्दीत आढळून आलेल्या अनोळखी तरूणाची ओळख पटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. बीड, नगर जिल्ह्यात माहिती घेण्यात आली असून अद्याप देखील ओळख पटली नाही. मृताबद्दल माहिती असल्यास अंभोरा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी