शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
6
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
9
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
10
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
11
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
12
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
13
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
14
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
15
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
16
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
17
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
19
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
20
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश

बीड-अहिल्यानगर मार्ग कामाची आधीच संथगती, त्यात पर्यायी पूल खचल्याने वाहनधारकांची कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 16:01 IST

आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपुर रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे.

- नितीन कांबळेकडा ( बीड) : गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असलेल्या साबलखेड ते चिंचपुर रस्ता कामाने नागरिकांना जेरीस आणले आहे. आता तर शेरी येथील पर्यायी व्यवस्था केलेला पूल खचल्याने वाहनाधारकांची तारांबळ उडाली आहे. सुदैवीने कसलीही दुर्दैवी घटना घडली नाही. बीड-अहिल्यानगर रस्त्यावरील वाहतूक आष्टी पोलिसांनी वळवली असून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे.

आष्टी तालुक्यातील साबलखेड ते चिंचपुर रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम गतीने होत नसल्याने वाहनधारकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे. यामुळे बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील शेरी बुद्रुक येथील पर्यायी पूल सकाळी खचला. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. ही माहिती मिळताच आष्टीचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर याच्यासह पोलिस नाईक विकास जाधव,बब्रुवाण वाणी,चालक प्रताप घोडके यांनी धाव घेत वाहतूक पर्यायी मार्गे वळवली आहे. मात्र, बीड-अहिल्यानगर महामार्गाची आधीच संथगती असून त्यात पर्यायी पूल खचल्याने वाहनधारकांची कोंडी झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने कामाची गती वाढवून महामार्ग लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

असे आहेत पर्यायी मार्ग: अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक आष्टी - बेलगाव - किन्ही - केरूळ - कडा- आष्टी मार्गे जामखेड बीड कडे जाणारी वाहतूक कडा - केरूळ - किन्ही - बेलगाव - आष्टी.

टॅग्स :Beedबीडhighwayमहामार्गRainपाऊस