शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

राष्ट्रवादीकडून नरेंद्र काळेंची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती; लागलीच मिळाली अवघड मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 17:29 IST

लागलीच सोपवली कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याच्या निरीक्षकपदाची जबाबदारी

अंबाजोगाई (बीड) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या डॉ. नरेंद्र काळे यांच्यावर पक्षाने आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. डॉ. काळे यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी डॉ. काळे यांना दिले. तसेच नियुक्तीनंतर त्यांच्याकडे कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर शहर व ग्रामीण जिल्हा निरीक्षक पदाचा पदभार ही सोपविण्यात आला आहे. 

अंबाजोगाई येथील डॉ. नरेंद्र काळे यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर त्यांच्याकडे  लातूर शहर व ग्रामीण जिल्हा निरीक्षक पदाचा पदभार ही सोपविण्यात आला आहे. या निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी डॉ. नरेंद्र काळे यांना दिले. डॉ. काळे यांना पक्ष संघटना बांधणीचा मोठा अनुभव आहे. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. काळे यांच्या नियुक्ती महत्वपूर्ण मानली जात आहे. 

डॉ. काळे हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष, दंत परिषदेचे सदस्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची अधिसमिती, विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कार्य केले आहे. सर्व स्तरातून डॉ. काळे यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडJayant Patilजयंत पाटील