शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या नराधमास दहा वर्षांचा सश्रम कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 18:47 IST

अंबाजोगाई अपर सत्र न्यायालयाचा निकाल,यावेळी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले.

अंबाजोगाई - मेहंदी क्लासला निघालेल्या अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने पळवून नेत तिच्यावर महिनाभर अत्याचार करणाऱ्या नराधम तरुणास अंबाजोगाई अपर सत्र न्या. डी.डी. खोचे यांनी दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा आणि एक लाख रूपये दंड ठोठावला. बाळासाहेब उर्फ खंडू धनंजय वळसे (रा. वळसे वस्ती, ता. केज) असे त्या तरुणाचे नाव आहे. 

अत्याचाराची ही घटना पाच वर्षांपूर्वी केज तालुक्यात घडली होती. खंडू वळसे याने मेहंदी क्लासला निघालेल्या अल्पवयीन मुलीस अडवून तिचे तोंड दबून जबरदस्तीने स्कॉर्पिओमध्ये टाकून पळवून नेले. तो तिला पुण्याला घेऊन गेला आणि तिथे तिला तब्बल एक महिना ठेवून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी २६ एप्रिल २०१७ रोजी केज पोलीस ठाण्यात खंडू याच्यावर कलम ३६३, ३७६ (i), ३४४, ३४ भा.द.वी सहकलम ३, ४ बा. लैं. अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद झाला. तत्कालीन पोलीस निरिक्षक आर. जी. गाडेवाड यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणाची सुनावणी अपर सत्र न्या. डी.डी. खोचे यांच्या न्यायालयासमोर झाली.

यावेळी सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून अपर सत्र न्या. डी.डी. खोचे यांनी आरोपीला दोषी ठरवले आणि त्यास दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व एक लाख रूपये दंड ठोठावला.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील रामेश्वर एम. ढेले यांनी काम पहिले. त्यांना वरीष्ठ सरकारी वकील अशोक व्ही कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले तर ॲड. नितीन पुजदेकर यांनी त्यांना मदत केली. पोलीस पैरवी म्हणून पो. हे. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय