शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
3
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
4
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
5
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
9
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
10
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
11
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
12
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
13
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
14
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
15
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
16
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
17
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
18
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
19
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
20
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई

सहशिक्षकाच्या त्रासाने शिक्षिकेला अश्रू अनावर;सावरगाव जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 4:20 PM

. या त्रासाला कंटाळून अखेर शिक्षिकेने माध्यमांसमोर याची वाचा फोडली यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

ठळक मुद्देअंगविक्षेपावर थट्टा उडवणेविद्यार्थ्यांसमोर वयावरून खिल्ली उडवणे

माजलगाव : तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हापरिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेतील एका वयस्कर शिक्षिकेला ज्या की,विशाखा समितीच्या अध्यक्षा आहेत त्यांनाच सहकारी शिक्षक संदीप सोले अंगविक्षेपावर थट्टा उडवणे, विद्यार्थ्यांसमोर वयावरून खिल्ली उडवणे आदी अनेक प्रकारे छळवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या त्रासाला कंटाळून अखेर शिक्षिकेने माध्यमांसमोर याची वाचा फोडली यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. या सर्व प्रकाराने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून त्या शिक्षकावर कार्यवाहीची मागणी होत आहे. 

जिल्हापरिषदेच्या शिक्षकांमधील कुरबू-या तशा नवीन नाहीत मात्र सावरगाव येथील जी.प. शाळेतील संदीप सोले नावाचा शिक्षक येथील इतर शिक्षकांना त्रास देण्यात तसा पारंगतच म्हणावे लागेल. त्याला कारणही तसेच आहे सदर शिक्षक हा येथील महिला शिक्षकांना त्यांच्या नावाने अथवा महिलांप्रति कुठलाही आदर न ठेवता थेट अंगविक्षेपावरून हाका मारतो तसेच त्या शिक्षिकेकडे काही काम असल्यास किंवा त्यांना बोलवायचे असल्यास वयावरून "त्या म्हातारीला  बोलवा  " असे म्हणून हीन वागणूक देतो. यासोबतच मुख्याध्यापक बी.एस. शेंदरे हे गैरहजर असताना त्या शिक्षिकेकडे चार्ज दिल्यास शाळेची घंटी लपवून ठेवणे , वर्गावर मुद्दामहून न जाणे, त्रास होईल असे प्रकार करणे यामुळे सदर शिक्षिका ही वैतागून गेली आहे. 

मुळात या शिक्षिका ह्या वयस्कर असून नियत वयोमानानुसार अवघे दोन वर्षे सेवा निवृत्तीसाठी राहिल्यामुळे पुढे त्रास होऊ नये म्हणून संदीप सोले या शिक्षकाचा त्रास त्या सहन करीत राहिल्या. या बाबत मुख्याध्यापक बी.एस. शेंदरे , गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी यांच्याकडे तोंडी तक्रार करूनही या जबाबदार लोकांनी या शिक्षकाला पाठीशी घातले त्यामुळे शेवटी वैतागून त्यांनी माध्यमांना याबाबत कळविल्यानंतर ही बाब उघड झाली. सदर शिक्षकाच्या त्रासाबाबत  सांगताना अक्षरशः या वयस्क शिक्षिकेला अश्रू अनावर झाले. 

दरम्यान सदर शिक्षक हा शाळेत केवळ तनाने हजर असतो मात्र मनाने तो मोबाईलमध्ये  खेळत असलेला तसेच इतर शिक्षकांना  त्रास देण्याच्याच प्रतापात असतो या शिक्षकामुळे येथील अनेक शिक्षक हे त्रस्त आहेत तसेच विद्यार्थ्यांना देखील याचा त्रास असून अनेक विद्यार्थ्यांना मारहाण देखील या शिक्षकाने केलेली असल्याने या शिक्षकावर थेट निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी  होताना दिसत आहे. 

सावरगाव येथील शाळेवर झालेल्या प्रकाराची मला माहिती नाही या बाबत माहिती घेऊन कार्यवाही करण्यात येईल. - रवींद्र महामुनी, प्रभारी गटशिक्षणाधिकारी 

या बाबत सदरील शिक्षकाला मी दोन तीन वेळेस समज दिली आहे परंतु तो शिक्षक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही व सदर शिक्षिकेला वारंवार त्रास देत आहे या बाबत वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे. - बी.एस. शेंद्रे, मुख्याध्यापक

टॅग्स :WomenमहिलाTeacherशिक्षकBeedबीडEducationशिक्षण