शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारणाऱ्यांना धडा शिकवा : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:11 IST

राष्टÑवादी काँग्रेसने सत्तेत असताना सर्व सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर जाऊन लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न केले. पण महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारत असल्याने या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

कडा / आष्टी : राष्टÑवादी काँग्रेसने सत्तेत असताना सर्व सामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर जाऊन लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न केले. पण महाराष्टÑाच्या निवडणुकीत देशाच्या गप्पा मारत असल्याने या सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.आष्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ कडा येथे मौलाली बाबा दर्गा परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी मीनाक्षी पांडुळे होत्या. तर व्यासपीठावर उमेदवार आजबे, माजी आ. साहेबराव दरेकर, जेष्ठ स्वांतत्र्य सेनानी साहेबराव थोरवे, रामकृष्ण बांगर, महेंद्र गर्जे, डॉ. शिवाजीराव राऊत, रामभाऊ खाडे, ठकाराम दुधावडे, आप्पा राख, सतिश शिंदे, सुरेखा तलवार, शिवाजी डोके, रूपेश बेदरे , महेबूब शेख, नवनाथ तांदळेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.पवार म्हणाले, भाषण करताना बोलले ते तोलले पाहिजे. खोटे भाषण करणे आणि फसवणूक करणे याचा धंदा झाला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, वाढत जातीयवाद या प्रमुख समस्या असताना भाजपचे सरकार मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया यामध्ये व्यस्त आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरु केलेली शेतकरी कर्ज माफी योजना सपशेल फसवी असून हे भर सभेत पुराव्यानिशी अजित पवारांनी उपस्थितांना दाखवले. ज्याचं जळत त्यालाच कळत यामुळेच इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेले. महाराष्टÑाची सत्ता आमच्या हातात द्या तीन मिहन्यात ७/१२ कोरा करू, असे ते म्हणाले.बाळासाहेब आजबे म्हणाले, राजकारण करताना मी कधीच खोटे राजकारण केले नाही. इमाने इतबारे काम करत आलो. पण पंचायत समितीपासून आमदारकीच्या निवडणुकीपर्यंत धोकाच देण्याचे काम विरोधकांनी केले आहे. मतदारसंघात स्थानिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी मला साथ द्या आयुष्यभर उपकार विसरणार नसल्याचे आवाहन आजबे यांनी केले.माजी आ. साहेबराव दरेकर म्हणाले, गाडी बंद पडलेल्या आमदारांची गाडी ढकलून चालु करण्याचे काम मी करत आलो.पण गाडी चालु होताच त्यांनी गाडी पळवली. पण आता बाळासाहेब आजबे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून विजयाचा गुलाल लावणार असल्याचे दरेकर म्हणाले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ashti-acआष्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार