शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक संस्थांकडून रुग्णांचे चेहरे फुलविण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:27 IST

रूग्णांना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्स प्रयत्नशील असतात. मोठ्या शहरातील डॉक्टरांना रूग्ण सेवेसाठी शहरात बोलावून सर्व सामान्य रूग्णांच्या चेहºयावर हसू फुलविण्याचे काम बीड शहरातील सामाजिक संस्था करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले.

ठळक मुद्देअशोक थोरात : बीडमध्ये २३ रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी; जर्मन फाउंडेशनचा उपक्रम; मुंबईसह बीडच्या डॉक्टरांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रूग्णांना होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी डॉक्टर्स प्रयत्नशील असतात. मोठ्या शहरातील डॉक्टरांना रूग्ण सेवेसाठी शहरात बोलावून सर्व सामान्य रूग्णांच्या चेहºयावर हसू फुलविण्याचे काम बीड शहरातील सामाजिक संस्था करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केले.मुंबई येथील जर्मन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढाकारातून येथील विवेकांनद हॉस्पिटल येथे रोटरी क्लब, आदित्य डेंटल कॉलेज, जिल्हा रूग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शिबिरात दुभंगलेले ओठ व टाळू तसेच नाक, कान यासह बाह्यविकृतीच्या २५० रुग्णांची तपासणी करुन गरजू २३ रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्या. मुंबई येथील सर्जन डॉ.रंगनाथ झावर, डॉ.नितीन घाग, डॉ. रोहीत तोष्णीवाल, डॉ.संदीप येवले, डॉ.सचिन जेथलिया, डॉ. राहूल सारडा, डॉ.पी.सी.तांबडे, डॉ.प्रभाकर धायतडक, डॉ.संकेत बाहेती, डॉ.स्नेहल झावर, डॉ.पेनी मॅडम, डॉ.श्रीकांत केदार, डॉ.शशिकांत ठोंबरे आदींनी या शिबिरात योगदान दिले.यावेळी बोलतांना डॉ. रंगनाथ झावर म्हणाले, शिबिरात तपासणीनंतर आवश्यक असलेल्या रूग्णांवर बीड येथे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.बीड येथे शक्य नसणाºया संबंधित रुग्णांवर मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. रूग्णांची गरज पाहता असे तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर दर दोन महिन्याला बीड येथे घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.यावेळी डॉ. प्रशांत देशपांडे, सुहास जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी.पवार, अति. जि. शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, आर.एम.ओ. डॉ. एस.एल. हरिदास, डॉ. आदिती सारडा, शेषनारायण हाटवटे, रमेश तांगडे, राम मोटवाणी, प्रकाश कुलकर्णी, सुरेंद्र बारगजे, शिवलाल राठोड, वसंतराव डावकर, दादासाहेब डावकर, डॉ.बी.जी.झंवर, डॉ.तुषार श्रृंगारपुरे शिबीर प्रमुख विष्णूदास बियाणी, डॉ.अ‍ॅड.राजेंद्र सारडा, प्रकल्प सभापती सुरज लाहोटी आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.प्रास्ताविक प्रकल्प सभापती विष्णूदास बियाणी यांनी तर सूत्रसंचालन डॉ.राजेंद्र सारडा यांनी केले. यावेळी रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यर्कर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यSocialसामाजिक