शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चे विमा कंपनीच्या बीड कार्यालयात ठिय्या आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 00:19 IST

जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली २५ नोव्हेंबर रोजी बीड येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आक्रमक ठिय्या आंदोलन चालू केले होते.

बीड : २०१८ च्या खरिप हंगामातील अनेक शेतकऱ्यांचा क्षुल्लक त्रुटींमुळे पीकविमा ओरिएण्टल इन्शुरन्स कंपनीकडे थकीत आहे. जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीड पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली २५ नोव्हेंबर रोजी बीड येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आक्रमक ठिय्या आंदोलन चालू केले होते.तब्बल ३ तास आंदोलन चालल्याने सदर कार्यालयातील सर्व प्रशासकीय कामकाज खोळंबल्याने लातूर येथील ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय प्रबंधक आईतवाळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेतली. वंचित व क्षुल्लक त्रुटी असलेल्या शेतकºयांचे विमाप्रस्ताव व इतर कागदपत्रे यांची छाननी चालू असून, त्यांना येत्या १५ ते २० दिवसांत पात्र शेतकºयांना पीकविमा देण्याचा निर्णय देऊन पीकविमा रक्कम वर्ग करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव मंडळा चे कॉ. मोहन जाधव, कॉ. सुहास जायभाये यांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला. सदर आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, गेवराई ता.अध्यक्ष राजेंद्र डाके पाटील, बीड ता. अध्यक्ष लहू गायकवाड, शेतकरी नेते कमलाकर लांडे, सुधीर कथले, रेवकी सर्कल प्रमुख बळीराम शिंदे,पाचेगाव सर्कल प्रमुख उद्धव साबळे, परमेश्वर वीर, कैलास थोटे, राजेंद्र वीर, विठ्ठल कथले आदी पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलनCrop Insuranceपीक विमा