शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

वादग्रस्त पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे निलंबित; आ. मुंदडांच्या लक्षवेधीनंतर फडणवीसांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 11:38 IST

गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणे भोवले; आ. नमिता मुंदडा यांनी मांडली होती विधानसभेत लक्षवेधी

अंबाजोगाई/बीड: अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोफावलेले अवैध धंदे, गुंडगिरीकडे दुर्लक्ष करणे आणि बनावट दारूच्या कारखान्यावरील संशयास्पद कारवाई पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांना चांगलीच भोवली आहे. आ. नमिता मुंदडा यांनी ग्रामीण ठाण्यातील बेबंद कारभाराबद्दल लक्षवेधी दाखल केल्यानंतर मोरे यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत घोषणा केली.

ग्रामीण ठाण्याच्या प्रमुखपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे यांच्या सहेतुक दुर्लक्षामुळे सर्वत्र अवैध धंदे फोफावले आहेत. गुटखा, हातभट्टी, बनावट दारूची सर्रास विक्री वाढली. बेकायदेशीर क्लब, जुगारअड्डे राजरोसपणे सुरु असून गुंडांचा हैदोस वाढला आहे. ठाण्यात अवैध धंदेचालक, गुंड यांचा राबता असून त्यांना मोरे यांच्याकडून सन्मान तर सामान्य नागरिकांना मात्र दुय्यम दर्जाची वागणूक मिळू लागली. त्यांच्या काळात गैरप्रकारांवर एकही लक्षणीय कारवाई झाली नाही. याउलट अनेक वादग्रस्त प्रकार त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये घडले आहेत. दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर एसीबीने लाचखोरीचे गुन्हे नोंदवले. तसेच, जप्त केलेला गुटख्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन झाले.  पोलीस ठाण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेले गैरप्रकार ठाणेप्रमुख मोरे यांना माहिती नसावेत असे शक्य नाही, उलट त्यांच्या आशीर्वादामुळेच कर्मचारी गैरप्रकार करण्यास धजावत असावेत अशी कुजबुज सुरु झाली होती. 

बनावट दारूच्या कारखान्यावरील संशयास्पद कारवाईमोरे यांनी ०८ जुलै रोजी वरपगाव शिवारात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा मारून साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे दाखवले. मात्र, दुसऱ्याच दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्याच ठिकाणी छापा मारून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आदल्या दिवशीच पोलिसांनी छापा मारलेला असताना एक्साईजला पुन्हा मुद्देमाल कसा काय सापडला? मोरे यांनी आदल्या दिवशी फरार दाखवलेला मुख्य आरोपी एक्साईजच्या छाप्यावेळी त्या ठिकाणी होता हे देखील उघड झाले. तसेच, मोरे यांनी जागा मालकाचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचाही आरोप झाला. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबद्दल शंका निर्माण झाली. या सर्व प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचीही चर्चा रंगली. 

आमदारांनी दाखल केली लक्षवेधीअखेर, ग्रामीण पोलीस ठाण्यातील बेबंदशाही बद्दल नागरिक तक्रारी मांडू लागल्यानंतर आ. नमिता मुंदडा यांनी याबद्दल पोलीस अधीक्षक,  महासंचालक, गृहमंत्री यांना पत्र लिहिले. तसेच, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात याबाबत लक्षवेधी मांडली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी तत्काळ कार्यवाही करत मोरेंची अंबाजोगाईतून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोरे यांच्या निलंबनाची घोषणा केली.

बीडमध्येही वादग्रस्त कारकीर्दवासुदेव मोरे यांची यापूर्वीची बीड शहर येथील कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली आहे. १३ मे २०२० रोजी जिल्हाधिकारी बीड यांच्या आदेशानुसार लॉकडाऊन शिथिल असताना व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. यावेळी मोरे यांनी दुकानात घुसून व्यापाऱ्यांना विनाकारण  मारहाण केली. त्यामुळे बीड शहरातील व्यापाऱ्यांनी बंद होता. या प्रकरणात मोरे यांची उचलबांगडी करून औरंगाबादला बदली करण्यात आली होती.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBeedबीडPoliceपोलिस