शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

अहो, आश्चर्यम! बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून उतरवला पीक विमा

By शिरीष शिंदे | Updated: September 19, 2023 13:49 IST

पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढली; विमा कंपनीकडून चौकशी सुरु

बीड : तेलंगणा राज्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, कोल्हापूर, नागपूर व पुणे जिल्ह्यातील व्यक्तींनी बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून तब्बल १६ हजार २२९ एकरचा पीक विमा उतरवला असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भारतीय पीक विमा कंपनीच्या चौकशीत वेगवेगळी प्रकरणे समोर येत असल्याने पीक विमा घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे.

राज्यासह बीड जिल्ह्यात १ रुपया भरून पीक विमा योजनेचा पहिलाच प्रयोग खरीप हंगामात राबविण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याने योजनेत सहभाग घेत पीक विमा उतरवला. परंतु, काही शेतकऱ्यांनी अतिरिक्त विमा भरल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रापेक्षा अधिक पीक विमा काढला गेल्याने भारतीय पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कृषी व महसूल विभागासह संयुक्त पद्धतीने जायमोक्यावर जाऊन तपासणी केली. गावागावात जाऊन अतिरिक्त विमा भरलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली असता काही गावात ना शेतकरी सापडले ना त्यांची शेती सापडली. दरम्यान, यापूर्वी बीड एमआयडीसीचा परिसर शेत दाखवून १८० जणांनी ४६७ एकरचा पीक विमा, तर अंबाजोगाई तालुक्यातील एकाच गावातील २७९२ एकरचा विमा उतरवला होता. आता तर बीड नगरपालिकेची जागा शेत दाखवून विमा उतरवला असल्याचे समोर आले आहे.

१३ जणांनी भरला न.प. जागेवर विमाबीड येथील नगरपालिकेची जागा शेत दाखवून वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांनी पीक विमा भरला आहे. पीक विमा कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील अनकपूर येथील उत्तम पंजाराम ढेरे यांनी ८६ एकर, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील आदित्य चंद्रमणी वने यांनी २५०५ एकरचा विमा उतरवला आहे. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील लक्ष्मण भरत तेहाले यांनी १६४३ एकर, नागपूर जिल्ह्यातील मौंदा येथील मंदाबाई अंकुश राठोड यांनी ६३२ एकर, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील घोणसी बु्द्रुक येथील मीना ढेरे यांनी ६३० एकर, राम प्रसाद ढेरे ४४०३ एकर, सचिन गोफने यांनी १२१० एकर, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कुसेगाव येथील राजू अंकुश राठोड यांनी २४२१ एकर एवढ्या मोठ्या प्रमाणात विमा भरला आहे.

तलाठी यांनी दिला रिपोर्टभारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब इनकर यांनी बीड तहसीलदार यांना पत्र लिहून अतिरिक्त पीक विमा भरणाऱ्यांची यादी पाठवली होती. त्यानुसार तलाठ्यांनी सजा बलगुजर, बीड पिंगळे, बीड खोड व आहेर धानोरा या गावातील अभिलेखे तपासले असता सदरील शेतकऱ्यांची नावे आढळून आली नव्हती. त्यावरून १८८ शेतकऱ्यांनी ६३६८ हेक्टर अर्थात १६ हजार २२९ एकर क्षेत्रातील नियमबाह्य पीक विमा भरला असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द करावा, असे तहसीलदारांनी पीक विमा कंपनीला कळविले आहे.

पीक विमा रद्द केला जाईलज्या शेतकऱ्यांनी क्षेत्र नसतानाही पीक विमा भरला आहे त्यांचा पीक विमा रद्द केला जाईल. या संबंधीचा अहवाल आमच्या कंपनीच्यावतीने कृषी आयुक्त व जिल्हा कृषी विभागास दिला जाईल.-बाबासाहेब इनकर, जिल्हा व्यवस्थापक, भारतीय कृषी विमा कंपनी

टॅग्स :BeedबीडCrop Insuranceपीक विमाCrime Newsगुन्हेगारी