शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
2
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
3
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
4
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
5
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
6
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
7
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
8
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
9
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
10
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
11
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
12
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
13
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
14
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
15
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
16
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
17
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
18
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
19
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...

धनंजय मुंडेंना कोंडीत पकडणारे सुरेश धसही अडचणीत; कार्यकर्ता सतीश भोसले कुख्यात गुंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:47 IST

सतीश भोसले हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात बीड व अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ६ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड अडकल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडले. त्यानंतर आता खुद्द आमदार धसदेखील अशाच एका प्रकरणात अडचणीत आले आहेत. त्यांच्या सतीश भोसले नावाच्या कार्यकर्त्याने शिरूर तालुक्यात दहशत माजवली. एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण केल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचे समोरचे दात पाडले. त्यानंतर एका जीपमधून जाताना त्याने पैशांचे बंडल फेकून देत माज दाखवला आहे. मुंडे यांनी कराड निकटवर्तीय असल्याचे सांगितले होते, तसेच आमदार धस यांनीही भोसले हा आपलाच कार्यकर्ता असल्याची कबुली दिली आहे.

शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले आणि त्याच्या चार साथीदारांनी अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. याचा व्हिडीओ ५ मार्च रोजी साेशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तातडीने दखल घेत भोसलेसह त्याच्या साथीदारांवर पोलिस फिर्यादी होऊन शिरूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर लगेच भोसले याचे अनेक व्हिडीओ समोर आले. तो एका वाहनातून प्रवास करत असताना ५००, २०० रुपयांचे बंडल गाडीच्या समोरील काचांजवळ फेकताना दिसत आहे. तसेच आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांच्यासोबतचे काही फोटोही व्हायरल झाले. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आमदार धस यांच्यावर निशाणा साधत जसे धनंजय मुंडे तसेच आमदार धस आहेत. सर्व एकाच माळेचे मणी असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करावे, अशी मागणी केली. दरम्यान, पीडित कुटुंब गुन्हा दाखलसाठी शिरूर ठाण्यात गेले होते. परंतु, उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

सतीश भोसले कुख्यात गुन्हेगारसतीश भोसले हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात बीड व अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ६ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विवाहितेचा छळ करणे, अपहरण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे आदींचा समावेश आहे.

शिरूरमध्ये गोल्डन मॅन म्हणून ओळखसतीश भोसले याची आष्टी मतदारसंघातील शिरूर तालुक्यात दहशत आहे. त्याच्या गळ्यात आणि हातात किलोभर सोने असल्याचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. तसेच हेलिकॉप्टरमधून उतरताना, महागड्या वाहनांमधून रुबाबात प्रवास करतानाचे त्याचे व्हिडीओ आहेत. गोल्डन मॅन म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्याविरोधात कोणीही तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते.

बापाचे दात पाडले, मुलाचा पाय मोडलायाच सतीश भोसले याने शिरूर तालुक्यातील ढाकणे नामक व्यक्तीचे समोरील आठ दात पाडले होते, तर त्यांच्या मुलाचा पायही मोडला होता. त्यानंतर जखमी व्यक्ती हा हातात सलाईन घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयात आला होता. परंतु दहशतीपोटी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नव्हती. याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.

सुरेश धस म्हणाले, भोसले माझाच कार्यकर्तामारहाण करणारा व्यक्ती सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता असल्याची कबुली भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. मुलीच्या छेडछाडीच्या प्रकरणावरून ही मारहाण झाली होती. हा व्हिडीओ साधारण दीड वर्षांपूर्वीचा असल्याचा दावाही आमदार धस यांनी केला आहे.

लोक म्हणाले, हा शिरूरचा ‘आका’वाल्मीक कराड हा ‘आका’ आणि धनंजय मुंडे हे ‘आकाचे आका’ असे सूत्र आमदार धस यांनी जोडले होते. परंतु भोसलेचा व्हिडीओ व्हायरल होताच तो शिरूरचा ‘आका’ असल्याची चर्चा सुरू झाली. तसेच त्याच्या ‘आकाच्या आकाचा’ही शोध घ्यावा, अशी मागणी पोलिस ठाण्यात आलेल्यांनी केली.

टॅग्स :Suresh Dhasसुरेश धसDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडCrime Newsगुन्हेगारी