शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2019 12:03 AM

माझ्यासाठी पंधरा दिवस द्या, पाच वर्ष तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या, सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ता बैठकीत बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर । मला निवडून द्या अन् माझ्याकडून ५ वर्षे हक्काने सेवा करवून घ्या

बीड : बौध्द समाजाने दिलेला शब्द काळया दगडावरची रेघ आहे. माझे म्हणने पटत असेल तर साथ द्या, तुमची साथ ही सामाजिक परिवर्तनाची नांदी असते. माझ्यासाठी पंधरा दिवस द्या, पाच वर्ष तुमच्यासाठी हक्काने सेवा करवून घ्या, सामाजिक परिवर्तनासाठी साथ द्या, असे आवाहन बीड मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ता बैठकीत बोलताना जयदत्त क्षीरसागर यांनी केले.शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर कदम, दिलीप गोरे, अशोक कांबळे, नाना मस्के, आशिष चव्हाण, न.से.संजय होळकर, सचिन सोनवणे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्र माचे अध्यक्ष प्रकाश वडमारे हे होते.याप्रसंगी शिरूर पंचायत समितीच्या सदस्या उषा सरवदे म्हणाल्या की, बीड मतदार संघात आण्णा हेच पक्ष मानून धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबा आणि गोरगरीबांची, दलित पीडितांची सेवा करणाऱ्या जयदत्तअण्णांना विधानसभेत पाठवा. याप्रसंगी रिपाई एकतावादीचे जिल्हाध्यक्ष आशिष चव्हाण, अशोक कांबळे म्हणाले की, काकू-आण्णा-डॉ.भारतभूषण हे गोरगरीबांचे बीडमधील तारणहार आहेत. त्यांना साथ देणे हे आमचे कर्तव्य आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक दिलीप भोसले यांनी केले. याप्रसंगी अमोल पौळ, अमोल अहिरे, संगीता गायकवाड, बाळासाहेब काकडे, प्रियंका कामटे, राम हिरवे, कौशल्या गायकवाड, बबिता वडमारे, कमल पेठे, बबिता जावळे, जयश्री गवळी, कांता सरवदे, दिपा वंजारे, ईश्वरी धन्वे आदींसह पुरूष, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सत्तेची खुर्ची समाज परिवर्तनासाठीजयदत्तआण्णा म्हणाले की, सत्तेची खुर्ची समाज परिवर्तनासाठी असते. दुष्काळ हा भूतकाळ करावयाचा आहे. मलमपट्टया करून भागत नाही त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून समुद्राला वाहून जाणारे ६०० टी.एम.सी. पाणी मराठवाड्यातील ११ मोठ्या तलावात सोडून पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न सोडविणार. २०२२ पर्यंत एकही बेघर राहणार नाही. निराधारांना आधार, आंधळ्याची काठी, महिला सक्षमीकरण, गोरगरीबांच्या कल्याणासाठी शिक्षण, आरोग्य, निवारा, रस्ते, पाणी या सर्व सुविधा प्राधान्याने बीड जिल्ह्यात आणण्यासाठी आशिर्वाद द्यावा, असे आवाहन केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर