शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सुनील शेट्टीचे टोमॅटोच्या दरवाढीवर वक्तव्य; धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी पाठवले 5 kg टोमॅटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 15:45 IST

सुनील शेट्टीच्या वक्तव्याविरोधात कृषिमंत्री धनंजय मुडें यांच्या परळीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक आंदोलन.

परळी- भारतात टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. या दरवाढीचा मध्यमवर्गीयांना मोठा फटका बसला आहे. यातच अभिनेता सुनील शेट्टी(Sunil Shetty) याने टोमॅटोच्या वाढत्या किमतीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केली. यातच आता महाराष्ट्रचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी सुनील शेट्टीला 5 किलो टोमॅटो कुरिअरने पाठवून अनोखा निषेध व्यक्त केला आहे.

काय म्हणाला सुनील शेट्टी?टोमॅटोच्या दराविषयी एका मुलाखतीत बोलताना सुनील शेट्टी म्हणाला होता की, 'आजकाल टोमॅटोचे दर भलतेच वाढले आहेत. याचा परिणाम माझ्या घरातही झाला आहे. म्हणूनच मी टोमॅटो खाणे कमी केले आहे. तुम्हाला वाटत असेल मी तर सुपरस्टार आहे, मला या महागाईमुळे काही फरक पडत नसेल, पण हे खोटं आहे. आमच्यावरही महागाईचा परिणाम होतो.' या वक्तव्यामुळे सुनील शेट्टीवर अनेकांनी निशाणा साधला. 

धनंजय मुंडेंचा मतदारसंघ असलेल्या परळीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते डॉ. संतोष मुंडे यांच्या पुढाकाराने भाजीपाला मार्केटमध्ये रविवार(दि.१६) प्रतिकात्मक आंदोलन झाले. या वेळी राष्ट्रवादीच्या वतीने अभिनेता सुनील शेट्टीला 5 किलो टोमॅटो कुरिअरने पाठवण्यात आले. या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

धनंजय मुंडेंचा टोलादरम्यान, धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर बोलताना टोमॅटोचे दर वाढले म्हणून काही लोकांनी आंदोलनं केलीत. जर एखाद्या शेतकऱ्याला टोमॅटोचे जास्त पैसे मिळाले तर चांगले आहे. त्या बाबतीत राजाकरण व्हायला नको. एक महिना टोमॅटो नाही खाल्ले तर प्रोटीन कमी होणार नाही, असे म्हणत मुंडेंनी सुनिल शेट्टीला टोला लगावला.    

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेSunil Shettyसुनील शेट्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीडparli-acपरळी