मानसिक छळ केल्याने युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST2021-05-24T04:32:50+5:302021-05-24T04:32:50+5:30

मयत युवती बीड येथे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. सध्या लॉकडाऊन असल्याने ती घरीच असायची. आरोपी व त्याचा ...

Suicide by strangulation of a young woman due to mental torture | मानसिक छळ केल्याने युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

मानसिक छळ केल्याने युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

मयत युवती बीड येथे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. सध्या लॉकडाऊन असल्याने ती घरीच असायची. आरोपी व त्याचा मित्र सतत आमच्या घराकडे चकरा मारायचा. माझ्या मुलीला मोबाईलवर बोलायचा तसेच मेसेज कॉल करायचा. हा सगळा प्रकार आम्हाला माहीत नव्हता. परंतु घटनेच्या दिवशी माझी मुलगी एका शेतात जात आहे, असे मला एकाने सांगितले. मग आम्ही दोघे जण मोटारसायकलवर शोधाशोध करीत होतो. परंतु बालाजी कराडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला मृत अवस्थेत मुलगी आढळून आली. तिचा मोबाईल फोन आरोपींनी काढून घेत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आबासाहेब मुक्तिराम मदने, अशोक भागवत पांगरे, शहादेव महादेव लकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

....

आरोपी मोकाटच

गुन्हा दाखल होऊन काही दिवस लोटले तरी अद्यापपर्यंत आरोपींना चकलांबा पोलिसांनी अटक केली नाही. पोलीसच आरोपींना या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मदत करत असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईक यांनी केला आहे. संबंधित प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेच आरोपीला मदत करीत असल्याचे त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Suicide by strangulation of a young woman due to mental torture