शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पाण्याअभावी झाले उसाचे पाचट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:15 IST

तालुक्यात तब्बल ३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली; मात्र या वर्षीच्या भयानक अशा दुष्काळामुळे पाण्याअभावी या उसाचे आता पाचट होत चालले आहे

ठळक मुद्देतालुक्यातील ३००८ हेक्टर ऊस वाळला : उसाचे २६५ वाण स्वीकारण्यास साखर कारखान्यांचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. त्याचे कारण म्हणजे या तालुक्यातील शेतक-यांचा कल हा नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणा-या कापूस या पिकाकडे होता; पण कापसाचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी हे परवडत नसल्यामुळे शेतक-यांनी उसाच्या क्षेत्राची निवड करून तालुक्यात तब्बल ३ हजार ८ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली; मात्र या वर्षीच्या भयानक अशा दुष्काळामुळे पाण्याअभावी या उसाचे आता पाचट होत चालले आहेवडवणी तालुक्याच्या शेजारी मोठी तीन धरणे आहेत. माजलगाव धरण, कुंडलिका धरण उपळी, उर्ध्व कुडलिंका धरण सोन्नाखोटा हे तीन मोठी तलाव आहेत. या तलावाचा जास्त फायदा हा वडवणी तालुक्यातील जमिनीला होत आसल्याने या भागातील जमीन ही ओलिताखाली आल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांनी तब्बल ३ हजार ८ हेक्टरवर उसाची लागवड केली होती. पण यावर्षी पाऊस न पडल्यामुळे पाण्याअभावी हे उभे पीक वाळून गेली आहेत.भयानक दुष्काळाचा फटका या पिकांना बसत आहे. जी शेतकºयांची मदार शेजारच्या धरणाच्या पाण्यावर होती, पण पाऊस नसल्यामुळे या धरणात म्हणावा तसा पाणी साठा झाला नाही. जो थोडा फार पाणी साठा झाला, तो पिण्याच्या पाण्यासाठी ही धरणे आरक्षित केली असल्यामुळे ज्या शेतकºयांनी तलावाच्या पाण्यावर ऊस लागवड केली होती; मात्र हे पाणी आरक्षित केल्यामुळे पाटाला पाणी सोडले नसल्यामुळे ऊस वाळुन गेले आहेत. आता या उसाचे करायचे तरी काय, हा गंभीर प्रश्न शेतकºयांपुढे पडला आहे. आता या उसाचे सरपण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई