शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

बस वेळेवर सुटत नसल्याने कडा येथे विद्यार्थींनीना स्थानकातच करावा लागतो अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 19:11 IST

गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत  नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देआष्टी आगाराचे नियोजन कोलमडले बसस्थानकातच विद्यार्थिनींचा अभ्यासबिघडलेल्या वेळापत्रकाकडे आगर प्रमुखांचे दुर्लक्षबस वेळेवर सोडण्याची मागणी

कडा (बीड ) : गेल्या अनेक वर्षांपासून आष्टी आगाराचे नियोजन कोलमडले असल्याने ग्रामीण भागातील सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर येत  नाही. त्यामुळे रोजच विद्यार्थ्यांना घरी जायला अंधार पडतो. त्यामुळे या विद्यार्थिनींवर बसची वाट पाहत बसस्थानकात अभ्यास करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

आष्टी तालुक्यातील कडा या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा परिषद, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय असल्याने तालुक्यातून विद्यार्थी, विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. घरातून सकाळी सात वाजता बस थांब्यावर येऊन उभा राहावे लागते. मग येणाºया बसमध्ये बसून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाळा, कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे आणि चार वाजता पुन्हा बसस्थानकात येऊन उपाशीपोटी उभा राहत आॅर्डिनरी बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागते. या सा-या गोष्टींमुळे घरी जायला उशीर होऊन म्हणून अभ्यास करायला वेळ मिळत नाही. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसस्थानक परिसरातच अभ्यास करावा लागत आहे. ही परिस्थिती एक दिवसापुरतीच नव्हे तर वर्षानुवर्ष दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने याकडे गांभीर्याने पाहून अवेळी सुटणा-या आॅर्डिनरी बस वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी केली आहे.

आम्ही खेड्यापाड्यातून शिक्षण घेण्यासाठी शहरात येतो; पण शाळेतून घरी येईपर्यंत आई, वडील काळजी करतात; परंतु बस वेळेवर येत नसल्याने वाट पाहण्याशिवाय पर्याय नसल्याचे उंदरखेल येथील दहावीच्या रूपाली शेकडे, वृषाली वामन यांनी सांगितले. बस वेळेवर येत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. तसेच तहान- भूक विसरुन बससाठी ताटकळावे लागते. शिक्षणासाठी येणा-या ग्रामीण विद्यार्थ्यांची अशा प्रकारे हेळसांड होत आहे. 

लवकरच सुरळीत होईल

सध्या शाळेच्या शैक्षणिक सहली जात असल्याने बसेस वेळेवर उपलब्ध करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही वरिष्ठांकडे यासंदर्भात मागणी केली असून, लवकरच सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आष्टी आगार प्रमुख राजेंद्र दिवटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

परिवहन मंत्र्यांना निवेदन देणारअनेक ठिकाणी शाळेतून घरी जाताना उशीर झाल्याने विद्यार्थिनींवर वाईटप्रसंग ओढवल्याच्या घटना घडल्या असताना देखील यातून  कसलाच धडा न घेता एस.टी. महामंडळाला कसलेच गांभीर्य नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची सुरक्षा वा-यावर आली आहे. आष्टी आगाराने अवेळी सुटणा-या बसेस किमान वेळेवर तरी सोडाव्यात यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन देणार असल्याचे कडा येथील सरपंच दीपमाला ढोबळे यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थी