शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीग्रस्त विद्यार्थ्यांना हाकलले, पालकमंत्र्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 07:45 IST

HIV-AIDS : एकीकडे एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, काही ठिकाणी आजही त्यांना तुच्छ वागणूक दिली जात असल्याचे दिसत आहे.

बीड - एकीकडे एचआयव्ही बाधितांना समाजात सन्मान देऊन त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, काही ठिकाणी आजही त्यांना तुच्छ वागणूक दिली जात असल्याचे दिसत आहे. बीड तालुक्यातील पाली येथील जिल्हा परिषद शाळेतून एचआयव्ही बाधित पाच विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. याप्रकरणी पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.पाली येथे एचआयव्ही बाधित मुलांचा सांभाळ ‘इन्फंट इंडिया’ या संस्थेत केला जातो. येथे जवळपास ६४ विद्यार्थी राहतात. याच संस्थेत १ ली ते ५ वी पर्यंत शाळा आहे; परंतु शिक्षक येत नसल्याने बुधवारी येथील  पहिली ते पाचवीच्या वर्गातील पाच मुले पाली येथील जिल्हा परिषद शाळेत गेली. यावेळी येथील शाळा प्रशासनाने काही ग्रामस्थांच्या सांगण्यावरून आणि एचआयव्ही असल्याने त्यांना शाळेतून बाहेर काढल्याची तक्रार इन्फंटचे दत्ता बारगजे यांनी पालकमंत्री व शिक्षण विभागाकडे केली आहे.  याची चौकशी करून योग्य ती कारवाई न झाल्यास सत्याग्रह, बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही इन्फंट इंडिया संस्थेने दिला आहे.पाच मुले आली होती. परंतु, इन्फंट संस्थेत असलेल्या शाळेतील शिक्षक जावेद शेख हे आले आणि या विद्यार्थ्यांना घेऊन गेले. आम्ही त्यांना हाकलून वगैरे दिलेले नाही. त्यांचा प्रवेशही आमच्याकडे नाही. याच इन्फंटमधील ६ वी ते १० वीचे विद्यार्थी आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही दुजाभाव करणार नाही. झालेले आरोप खोटे आहेत.- के. एस. लाड, मुख्याध्यापक, जि. प. शाळा पालीजि. प. पाली येथील शाळेतून आमच्या पाच विद्यार्थ्यांना हाकलून दिले. इन्फंटच्या संस्थेतील प्राथमिक शाळेतील दोन्ही शिक्षक आतापर्यंत आलेले नाहीत. ही शाळा पालीच्या शाळेअंतर्गत आहे. याबाबत आम्ही तक्रार केली आहे.- संध्य बारगजे, संचालिका, इन्फंट इंडिया, पालीआठ दिवसांपासून मी आजारी होतो. बुधवारी मी शाळेवर गेलो. दुपारी मी पाली येथील शाळेतून पाच विद्यार्थ्यांना रिक्षा करून इन्फंटच्या संस्थेवर घेऊन गेलो. परंतु, संस्थेतील सरांनी मुलांना पाली येथील शाळेतच घालायचे आहे, असे सांगितले आणि पुन्हा त्यांना परत नेले. विद्यार्थ्यांना हाकलले नसून, मी स्वत: घेऊन गेलो होतो. झालेले आरोप व तक्रार निरर्थक आहे.- जावेद शेख, शिक्षक, जि. प. शाळा इन्फंट संस्था बीड

टॅग्स :HIV-AIDSएड्सHealthआरोग्य