शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची कडक भूमिका; बीडमध्ये मनोज जंरागेसह ४२५ आंदोलकांवर गुन्हा दाखल

By सोमनाथ खताळ | Updated: February 26, 2024 17:41 IST

बीड जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

बीड : पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जिल्ह्यात २२ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावर पोलिसांनी कडक कारवाई करत ४२५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मनोज जरांगे यांच्याविरोधात शिरूर आणि अंमळनेर या दोन पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यात २४ फेब्रुवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. काही ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. परंतु, कोठेही अनुचित प्रकार घडला नव्हता. पोलिसांनी एकाही आंदोलनासाठी परवानगी दिलेली नव्हती. असे असतानाही २२ ठिकाणी रस्ता अडवून सामान्यांना वेठीस धरण्यात आले होते. वाहनांच्याही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सामान्यांना त्रास झाला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत २२ गुन्हे दाखल झाले असून जवळपास ४२५ पेक्षा जास्त आंदोलकांचा यात समावेश आहे. तसेच, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर व शिरूर पोलिस ठाण्यात मनोज जरांगे यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. जरांगे यांच्या आवाहनानुसार हे आंदोलन झाल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

बीडची इंटरनेट, बससेवा केली बंदअफवा पसरणार नाहीत, यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा दुपारी १२ ते ५ अशी पाच तासांसाठी बंद करण्यात आली होती. त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालनाकडे जाणाऱ्या बसही रविवारी मध्यरात्रीपासूनच थांबविण्यात आल्या होत्या. बीड व जालना जिल्ह्याची सीमाही सील केली होती. जिल्ह्यात २८ ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला होता.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालनाBeedबीडCrime Newsगुन्हेगारी