शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत शिक्षकांवर लाठीमार, बीडमध्ये निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:12 IST

वेतन मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर मुंबई येथील आझाद मैदानावर लाठीमार करण्यात आल्याने येथील शिक्षण क्षेत्रात संताप निर्माण झाला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

बीड : वेतन मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शिक्षकांवर मुंबई येथील आझाद मैदानावर लाठीमार करण्यात आल्याने येथील शिक्षण क्षेत्रात संताप निर्माण झाला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात सहभागी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था चालक संघटना समन्वय समितीने शिक्षकांवरील लाठीमाराचा निषेध केला. त्याचबरोबर दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारुन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.मराठवाडा शिक्षक संघाचे राजकुमार कदम, डी.जी.तांदळे, संस्था चालक महामंडळाचे दीपक घुमरे, मुख्याध्यापक संघाचे विष्णूपंत रसाळ यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून शिक्षकांवरील लाठीमाराचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, दहा ते वीस वर्षे विनावेतन काम करणाºया शिक्षकांना वेतन देण्याऐवजी लाठीमार करण्यात आला.ही लांच्छनास्पद बाब आहे. या शिक्षकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत. तर अनेक शिक्षक एक रु पया ही वेतन न घेता सेवानिवृत्त झाले आहेत.कायम शब्द काढलेल्या सुमारे चार हजार शाळांवर कार्यरत सुमारे पन्नास हजार शिक्षकांना शंभर टक्के अनुदानाची तरतूद करावी. लाठीमार करणा-या पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. कालिदास धपाटे, गणेश आजबे, युवराज मुरूमकर, विनोद सवासे, उत्तमराव पवार, गोविंदराव वाघ, प्रा. मारूती वाघमारे, बी.टी.खाडे, जयदत्त सुद्रुक यांच्यासह शेकडो शिक्षक निदर्शनात सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडTeacherशिक्षकagitationआंदोलनBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड