शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पाण्यामध्ये, शेतकऱ्यांचे नुकसान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:36 IST

परिसरातील अनेक भागात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : तालुक्यासह परिसरातील अनेक भागात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने शेतात पूर्णपणे पाणी साचले आहे. त्यामुळे सोयाबीनचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दाणादाण उडाली. शेतकऱ्यांना शेतीची कामे करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेतक-यांनी सोयाबीन काढून त्याची गरज रचली आहे. पण अचानक सुरू होणा-या पावसामुळे शेतक-यांना त्याची रास करण्यास अडचणी येत आहेत. पावसाने यावर्षीही हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसामुळे हिरावला आहे. दुपारपर्यंत आॅक्टोबर हिटचा सामना करणाºया शेतक-यांना दुपारनंतर पावसाचा सामना करावा लागत आहे.आपेगाव परिसरातील तटबोरगाव, आपेगाव, धानोरा, कोपरा, अंजनपूर व इतर गावांत सोयाबीन काढणीअभावी शेतात भिजत आहे. यामुळे शेतक-यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यातच निवडणुकीच्या धामधुमीत मजूर वर्ग वेळेवर उपलब्ध झाला नाही. यामुळे मिळालेल्या वेळेत खळे करून घेणे शक्य झाले नाही. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला जेमतेम पडलेल्या पावसाने शेतक-यांनी पेरणी केलेले पीक जोमात होती. चांगली फळधारणा होती. मात्र, खळ्यासाठी सज्ज असलेल्या शेतक-यांवर आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडयापासून पावसाने सुरुवात केल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावरून घेतला आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.उत्पादनात घट होण्याची शक्यतापरतीच्या पावसाने मुक्काम वाढविल्यामुळे सोयाबीन, उडीद व मूग या पिकांच्या उत्पन्नात यावर्षीही घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिणामी शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असल्याचे चित्र आहे. लवकर खळे करून यंदाची दिवाळी गोड करावी या आशेने शेतक-याने केलेल्या नियोजनावर पावसाने पाणी फेरले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पाऊस कधी उघडीप देईल, याकडे लक्ष आहे.यावर्षी पावसाअभावी खरीप गेलेला आहे. रब्बीची चिंता वाढली असतांना आता चार दिवसापासून पाऊस उघडायचे नाव घेत नाही. या पावसामुळे शेतक-यांचे सोयाबीन पाण्याखाली गेले.अक्षरश: काढून टाकलेले सोयाबीचे कडप पाण्यावर पोहत आहेत. उभ्या सोयाबीनला कर फुटत आहेत. शेतक-यांची वर्षभराची मेहनत वाया गेली असून प्रचंड प्रमाणात सोयीबनचे नुकसान होत आहे.हवामान खात्याकडून पावसाचा मुक्काम ३० आॅक्टोबरपर्यत वाढणार असल्याचा अंदाज वर्तविल्यामुळे धाकधुक वाढली आहे. खरीप हंगामातील पिके हातून जाण्याची भीती वाटत आहे.आठ दिवसांपासून दररोज पाऊस पडत असल्यामुळे परिसर जलमय झाला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी